Ahilya Shatrughan Shinde selected for Uzbekistan Asian Wrestling Championship  sakal
क्रीडा

अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिची उझबेकिस्तान एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड

शिरसोडी ( ता. इंदापूर ) येथील युवा कुस्ती खेळाडू कु.अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिची उझबेकिस्तान येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : शिरसोडी ( ता. इंदापूर ) येथील युवा कुस्ती खेळाडू कु.अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिची उझबेकिस्तान येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. दि. १४ ते १६ जुलै दरम्यान या स्पर्धा उझबेकिस्तान येथे होणार आहे.ती इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. दि. १६ मे रोजी लखनौ (उत्तर प्रदेश) येथील साई स्टेडियम मध्ये झालेल्या निवड चाचणीत ४९ किलो वजन गटात तिची निवड झाली. या चाचणी स्पर्धेचे आयोजन अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केले होते.ब्रिजभूषण सिंह यांच्याच हस्ते कु.अहिल्या शिंदे हिला निवडीचे पत्र देण्यात आले.

यापूर्वी तिने १५ डिसेंबर २०२१ रोजी रांची ( झारखंड) येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ५० किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले होते.तसेच १७ एप्रिल २०२२ रोजी रांची ( झारखंड ) येथे झालेल्या स्पर्धेत १७ वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनिअर महिला कुस्तीस्पर्धेत ४९ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या ती हिस्सार - उमरा ( हरियाणा ) येथील गुरू हवासिंग आखाडा येथे प्रशिक्षक संजय मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिला चुलते पैलवान ऋषिकेश शिंदे यांची अनमोल साथ मिळत आहे. या निवडी बद्दल तिचे राज्याचे सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT