India Vs Pakistan World Cup 2023 esakal
क्रीडा

IND vs PAK : पोलिसांसमोर 'गुटखा' शौकीनांचे मोठं आव्हान, नरेंद्र मोदी स्टेडियमवर पिचकाऱ्या रोखण्यासाठी करावे लागणार विशेष प्रयत्न

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan World Cup 2023 : भारत - पाकिस्तान सामन्यासाठी जगातील सर्वात मोठं स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम हे सज्ज झालं आहे. जवळपास 13 हजार पोलीस या सामन्यासाठी बंदोबस्तात तैनात असणार आहेत. मात्र या पोलिसांसमोर सुरक्षेसोबतच गुडखा खाणाऱ्या लोकांची देखील मोठी समस्या असणार आहे.

गुजरात क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट चाहत्यांनी पान मसाला आणि गुटखा घेऊन मैदानात येऊ नये अशी विनंती केली आहे. या गुडख्यामुळे बाथरूमच्या पाईप ब्लॉक होत आहेत. त्यामुळे बेसिनमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण देखील वाढते. गुटख्यामुळे वातावरण दुषित होते.

गुजरात क्रिकेट असोसिएशनला गुटखा खाऊन थूंकलेली घाण साफ करण्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो. राज्य सरकारने निकोटीन बेस गुटख्यावर गेल्या वर्षी बंदी घातली होती.

मात्र तरी देखील गुटखा शौकीनांसाठी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने उपलब्ध केलाच जातो आहे.

गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'गुटखा थुंकून केलेली घाण साफ करण्यासाठी पैसा आणि वेळ देखील वाया जातो. अनेवेळा सिंक ब्लॉक झाल्याच्या देखील तक्रारी येतात. सिंकमध्ये गुटखा थुंकला जातो. आम्ही स्टेडियममध्ये पान मसाला आणि गुटखा घेऊन येऊ नये अशी चाहत्यांना विनंती करत आहोत.'

दरम्यान, पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी भारताने आपल्या संघात एक बदल केला आहे. डेंग्यूमुळे पहिले दोन सामने मुकलेला शुभमन गिल पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याद्वारे आपले वनडे वर्ल्डकप पदार्पण करणार आहे.

शुभमन गिल हा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात टायटन्सचे होम ग्राऊड असल्याने गिलसाठी ही खेळपट्टी पोषक ठकरण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT