ajinkya rahane career ended in IPL after Team India sakal
क्रीडा

टीम इंडियानंतर IPL मधूनही दिला डच्चू; दिग्गज खेळाडूचे करिअर संपुष्टात ?

टीम इंडियातून आधीच वगळण्यात आले, पण आता आयपीएल टीमनेही त्याला सोडले...

Kiran Mahanavar

Ajinkya Rahane : आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. येथे खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. आयपीएल 2023 च्या लिलावापूर्वीच सर्व संघांनी बीसीसीआयला कायम ठेवलेले आणि सोडलेले खेळाडूंची यादी सादर केली आहे. पण असा एक खेळाडू आहे, ज्याला आधीच टीम इंडियातून वगळण्यात आले आहे, पण आता त्याच्या आयपीएल टीमनेही त्याला सोडले आहे. हा खेळाडू अतिशय खराब फॉर्मशी झुंजत आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला सोडले आहे. गेल्या वेळी केकेआर संघाने त्याला भरघोस रक्कम देऊन आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले होते, पण तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना निराश केले. आयपीएल 2022 च्या 7 सामन्यात त्याने केवळ 133 धावा केल्या. याच कारणामुळे केकेआरने त्याला आपल्या संघातून वगळले आहे.

अजिंक्य रहाणेने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यानंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने एक-दोन हंगामात चांगली कामगिरी केली, पण त्यानंतर त्याच्या बॅट शांत झाली. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्समध्येही गेला आणि कोलकाता नाईट रायडर्सकडूनही खेळला, पण तो त्याच्या खेळात रंग भरू शकला नाही. त्याने आयपीएलच्या 158 सामन्यांमध्ये 4074 धावा केल्या आहेत.

अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे. त्याने शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून त्याला संघात संधी मिळाली नाही. त्याचवेळी तो दीर्घकाळ एकदिवसीय आणि टी-20 संघाबाहेर आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक युवा क्रिकेटपटूंनी भारतीय संघात त्याची जागा घेतली आहे. अशा स्थितीत त्याचे पुनरागमन फार कठीण वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT