Ajinkya Rahane dedicates his ton to those who stood by his side 
क्रीडा

INDvsWI : रहाणेचा दिलदारपणा, बघा कोणाला केलं शतक अर्पण

वृत्तसंस्था

अॅंटीगा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मधल्या फळीत उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने शानदार शतक झळकावून आपल्या फॉर्मविषयी टिका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. त्याने हे शतक कठीण प्रसंगी त्याची साथ देणाऱ्यांना समर्पित केले आहे. 

''पहिल्या डावात माझी खेळी संघासाठी खूप महत्त्वाची होती. मी सध्या फॉर्मात नसल्याने माझ्यावर खूप टीका करण्यात येत होत्या मात्र, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. दुसऱ्या डावात मी शतक केलं आणि याचं मला खूप समाधान आहे. माझ्या कठीण प्रसंगी ज्यांनी माझी साथ दिली, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, पाठीशी उभे राहिले त्यांना हे शतक समर्पित करतो,'' अशा शब्दांत दिलदार रहाणेने आपले मत व्यक्त केले. 

रहाणेने हनुमा विहारीच्या साथीत भारताचे आव्हान भक्कम केले. कारकिर्दीतले दहावे शतक साजरे करताना त्याने विहारीच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली. रहाणेने संयमाने फलंदाजी करताना कारकिर्दीमधील दहावे शतक साजरे केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Drugs Racket : बंगळूरमधील ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त; आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगेच्या व्याख्येशी संबंधित प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली

China Railway Speed : दोन सेकंदांतच रेल्वेचा वेग ताशी ७०० किमीवर; चीनमध्ये ‘मॅगलेव्ह’ तंत्रज्ञानाची किमया

Gautam Gambhir: गौतम गंभीरचं पद धोक्यात? 'या' अनुभवी खेळाडूला ऑफर; कसोटी संघासाठी BCCIचा ‘प्लॅन B’ तयार!

SCROLL FOR NEXT