Ajinkya Rahane Injury Wife Radhika Post
Ajinkya Rahane Injury Wife Radhika Post  ESAKAL
क्रीडा

Ajinkya Rahane Injury : अजिंक्यने दुखऱ्या बोटाबाबत घेतला मोठा निर्णय, पत्नीची भावनिक पोस्ट होतेय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Ajinkya Rahane Injury Wife Radhika Post : भारताच्या कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने जवळपास दीड वर्षांनी भारतीय संघात दमदार पुनरागमन केले. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC Final मधील भारताच्या पहिल्या डावात 89 धावांची झुंजार खेळी केली. या खेळीच्या जोरावरच भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या.

मात्र या खेळीदरम्यान, अजिंक्य रहाणेच्या बोटाला दुखापत झाली. वेगवान गोलंदाजाचा चेंडू त्याच्या हातावर आदळल्याने तो वेदनेने कळवळत होता. मात्र तरी देखील अजिंक्यने मैदान सोडले नाही. तो फलंदाजी करत राहिला अन् भारताला सन्मानजनक स्थितीत पोहचवले.

भारताची अवस्था 6 बाद 152 धावा अशी झाली असताना अजिंक्य रहाणेने आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची शतकी भागीदारी रचली. शार्दुल ठाकूरने 51 धावांचे योगदान दिले. दरम्यान, पॅट कमिन्सचा बाऊन्सर हा अजिंक्य रहाणेच्या हाताच्या बोटावर लागल्याने त्याला प्रचंड वेदना होत होत्या. मात्र फिजिओकडून थोडे उपचार घेत अजिंक्यने पुन्हा फलंदाजी करण्यास सुरूवात केली. अजिंक्यने सामना सुरू असताना आपल्या बोटाचे स्कॅन केले नाही. याबाबत अजिंक्यची पत्नी राधिकाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली.

राधिका आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, 'तुझे बोट सुजलेले असतानाही तू तुझी मानकिसता बदलली नाहीस. फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करून स्कॅन देखील करून घेतले नाही. तू दृढ निश्चिय आणि निस्वार्थ भावना दाखवलीस. तू हार मानली नाहीस आणि क्रीजवर जावून आम्हाला प्रेरित केलेस. मला तुझ्या व्यक्तीमत्वावर गर्व आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.'

राधिकाच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच रोहितची पत्नी रितिका सजदेहने देखील प्रतिक्रिया दिली. चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने देखील अजिंक्यला सेल्युट करताना इमोजी शेअर केला. अभिनेत्री सायामीने देखील या पोस्टवर इमोजीद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. चाहत्यांनी रहाणेला सुपरस्टार म्हणत त्याच्या झुंजार खेळीचे कौतुक केले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT