Team India Playing 11 West Indies 1st Test : भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 जुलैपासून खेळला जाणार आहे. यावेळी चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद शमी वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियासोबत नसतील. अशा परिस्थितीत त्या दोन खेळाडूंची जागा कोण घेणार? हा मोठा प्रश्न आहे. संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत पण पत्रकार परिषदेत त्याकडे नक्कीच लक्ष वेधले.
अजिंक्य रहाणे म्हणाला की, पुजारा आणि शमीच्या अनुपस्थितीत कोणत्याही खेळाडूसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी असेल. पुजाराच्या गैरहजेरीमुळे टीम इंडियातील नंबर 3 ची जागा रिक्त आहे. त्याचवेळी शमीच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजी ब्रिगेड थोडी खचलेली दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत जो खेळाडू योग्य असेल तोच खेळाडू या दोन खेळाडूंची जागा घेईल.
पुजारा टीम इंडियात तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा. पुजाराला भारतीय क्रिकेटची दुसरी भिंत म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे त्याने एकतर अनेक कसोटी स्वबळावर जिंकल्या आहेत किंवा त्या ड्रॉ केल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध पुजाराची फलंदाजीची सरासरी 35 च्या जवळपास आहे.
आता प्रश्न आहे की पुजाराची जागा कोण घेणार? तर याला प्रत्युत्तर देताना रहाणेने म्हटले आहे की, या ठिकाणी खेळू शकणारे अनेक खेळाडू आहेत. ज्याला ही संधी मिळेल, त्याच्यासाठी ही मोठी संधी असेल.
तरीही रहाणेने येथे एकाही क्रिकेटपटूचे नाव घेतले नाही. पण, पुजाराची जागा घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे तो यशस्वी जैस्वाल. डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 80 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. याशिवाय बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही यशस्वीने आपल्या फॉर्ममध्ये असल्याचे ट्रेलर दाखवले आहे.
टीम इंडियात शमीच्या स्थानावर खेळण्यासाठी रहाणेने सिराज आणि उनाडकट यांची नावे घेतली. या दोघांनाही खूप अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही लाल चेंडूचे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीत यापैकी कोणीही शमीची जागा घेऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.