Ajinkya Rahane opens up on his performance in 1st test against West Indies  
क्रीडा

INDvsWI : मी स्वार्थी नाहीये, शतकं हुकलं की वाईट वाटायला...

वृत्तसंस्था

अॅंटीग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. त्यावेळी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आधी लोकेश राहुल आणि मग हनुमा विहारी यांच्यासह डाव सावरला. रहाणे पहिल्या डावात 81 धावांवर बाद झाला. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने शतक हुकल्याचे अजिबात दु:ख नाही असे स्पष्ट केले. 

''मी जोपर्यंत खेळपट्टीवर असतो, तोपर्यंत मी संघाचा विचार करत असतो. मी स्वार्थी माणूस नाहीये, त्यामुळे शतक हुकल्याचं मला फारसं दुःख वाटत नाही. पहिल्या दिवशी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं होतं, त्यामुळे माझी खेळी संघाच्या कामी आली हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. एका क्षणाला माझ्या मनात शतकाचा विचार होता, मात्र खराब सुरुवात झाल्यानंतर खेळपट्टीवर टिकून राहणं अधिक गरजेचं होतं. संघाला गरज असताना मी योग्य खेळी केली ही सर्वात मोठी गोष्ट आहे.'' अजिंक्य आपल्या हुकलेल्या शतकाच्या संधीबद्दल बोलत होता.

आपल्या खेळीबद्दल बोलताना तो म्हणाला,''खूप दिवसांनंतर मी भारतीय संघात पुनरागमन करत आहे. आता मला मिळालेल्या या संधीचा मला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT