Ajinkya Rahane WTC Final
Ajinkya Rahane WTC Final  esakal
क्रीडा

Ajinkya Rahane : तब्बल 512 दिवसांनी परतलेला मराठमोळ्या अजिंक्य झाला 5 हजारी मनसबदार!

अनिरुद्ध संकपाळ

Ajinkya Rahane WTC Final : इंग्लंडच्या ओव्हलवर सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पहिले दोन दिवस भारतासाठी फार कठिण गेले. नाणेफेक जिंकून प्रथम कांगारूंना फलंदाजीला बोलावलं अन् त्यांनी दीड दिवसातच 469 धावा ठोकल्या. वाटलं खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे मात्र कांगारूंनी दुसऱ्या दिवशीच भारताच्या पहिल्या डावत 5 बाद 151 धावा अशी अवस्था करून ठेवली. भारतीय गोटात निराशेचे वातावरण पसरले होते.

मात्र बिकट परिस्थितीतून झुंजार मराठी बाणा दाखवत अजिंक्य रहाणेने कांगारूंना तगडी फाईट दिली. त्याला रविंद्र जडेजाने 48 धावांचे योगदान देत दमदार साथ दिली. मात्र ही भागीदारी फार काळा टिकली नाही. रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेवरच भारताची भिस्त होती. तब्बल 512 दिवसांनी पुनरागमन करणाऱ्या अजिंक्यनेही झुंजार अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमधील 5000 धावांचा टप्पा देखील पूर्ण केला.

अजिंक्य रहाणे तिसऱ्या दिवशी श्रीकार भरतसोबत खेळण्यासाठी आला. भारत त्यावेळी 151 धावांवर होता. मात्र अवघ्या एक धावची भर पडल्यानंतर बोलँडने श्रीकार भरतला माघारी धाडले. भारताचा फलंदाज म्हणवा असा खेळाडू माघारी परतला होता. आता अष्टपैलू आणि गोलंदाज येणार होते. त्यामुळे अजिंक्यवरची जबाबदारी अजून वाढली होती. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत शार्दुल ठाकूर सोबत सातव्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली.

मुंबईच्या या दोन खडूस खेळाडूंनी भारताला कठिण परिस्थितून हळूहळू बाहेर काढले. आधी त्यांनी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला 200 चा टप्पा पार करून दिला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने आपला गिअर बदलला. शार्दुलनेही संधी मिळताच मोठा फटका खेळत धावा वसूल केल्या. या दोघांना जीवनदानही मिळाले. मात्र नशीब देखील प्रयत्न करणाऱ्यांची साथ देतं!

शार्दुल आणि अजिंक्यने सातव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली. उपहारासाठी खेळ थांबला त्यावेळी अजिंक्य 122 चेंडूत नाबाद 89 तर शार्दुल ठाकूर 36 धावा करून नाबाद होता.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT