Ajinkya Rahane set to miss remaining IPL
Ajinkya Rahane set to miss remaining IPL esakal
क्रीडा

IPL सोडण्याची दिग्गजांमध्ये लागली स्पर्धा; केकेआरचा अजिंक्य रहाणे देखील आऊट

धनश्री ओतारी

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 15 व्या सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडताना दिसत आहे. अशातच ओपनर अजिंक्य रहाणे आयपीएलमधून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तो आता आगामी मॅच खेळणार नाही. केकेआरने आत्तापर्यंत 13 मॅच खेळले आहेत ज्यामध्ये केवळ 6 सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी खूप महत्त्वाचा होता. या सामन्यात अखेर कोलकात्याच्या टीमने बाजी मारली. मात्र तरीही कोलकात्याचा ओपनर अजिंक्य रहाणेवर टीका करण्यात आल्या. हैदराबादविरूद्ध त्याला साजेसा खेळ करता आला नाही. दुखापत होऊनही अजिंक्य रहाणे एखाद्या लढवय्याप्रमाणे मैदानावर उभा होता.

हैदराबादविरूद्ध सुरुवात करताना अजिंक्य रहाणे सावध पवित्र्यात होता. यावेळी त्याने अधूनमधून मोठे फटके खेळले. मात्र उमरान मलिकने 28 रन्समध्ये अजिंक्यला माघारी धाडलं.

मात्र मैदानावर फलंदाजी करत असताना अजिंक्य रहाणेला वेदनांचाही सामना करावा लागला. अजिंक्यच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते. यावेळी तो प्राथमिक उपचार घेऊन तो खेळत राहिला. पण, उमरान मलिकच्या ओव्हरमध्ये शशांक सिंगने अफलातून कॅच घेत अजिंक्यला पव्हेलियनमध्ये पाठवलं.

याच कारणास्तव तो आता आयपीएलधून बाहेर पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चार महिन्यांसाठी त्याला नॅशनल क्रिकेट अॅकडमीमध्ये पाठवण्यात येणार आहे.

केकेआरने रहाणेला 1 कोटी बेस प्राइसवर विकत घेण्यात आले होते. 7 मॅचमध्ये रहाणेला खेळण्याची संधी मिळाली. यावेळी त्याला केवळ 19 सरासरीने 133 धावा करता आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT