Ajinkya Rahane esakal
क्रीडा

Ajinkya Rahane : खेळपट्टीवर टिकून 'रहाणे' अजिंक्यनं दाखवून दिलं!

ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील फायनलमध्ये रहाणेनं आपण कशाप्रकारचे फलंदाज आहोत हे त्यानं दाखवून दिलं आहे. त्याला मोठी खेळी उभारण्यात यश आले आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Ajinkya Rahane WTC Final 2023 Super batting Vs Australia : भारताचा अष्टपैलू खेळाडू अजिंक्य रहाणेनं ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर कशा प्रकारे फलंदाजी करायची असते हे दाखवून दिले आहे. जिथे रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांच्या सारख्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या असताना रहाणेनं संघाची कमान सांभाळली. त्यानं एका बाजूनं लढा देत आपल्या खेळीनं भारतीय संघाला आदर देण्याचा मोठा प्रयत्न केला आहे.

आयपीएलचा सीझनही अजिंक्य रहाणेनं गाजवला. त्या लिग मध्ये त्यानं सीएसकेसाठी चांगली कामगिरी केली. रहाणे खरंतर वेगळ्या शैलीचा आणि धाटणीचा खेळाडू. तो फारसा त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जात नाही. अशावेळी त्यानं आयपीएलमध्ये आपल्या खेळीनं चाहत्यांना जिंकून घेतले. ड्ब्ल्यु टी सीच्या फायनलमध्ये रहाणेनं केलेली खेळी ही अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. बऱ्याच दिवसांपासून रहाणेच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील फायनलमध्ये रहाणेनं आपण कशाप्रकारचे फलंदाज आहोत हे त्यानं दाखवून दिलं आहे. त्याला मोठी खेळी उभारण्यात यश आले आहे. यापूर्वी या दौऱ्यावर जाण्यापूर्वी तो यशस्वी होणार की नाही याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात होते. आता मात्र त्या सगळ्या प्रश्नांवर रहाणेनं त्याच्या बॅटनं उत्तर दिलं आहे. उपहारापर्यत मिळालेल्या माहितीनुसार रहाणे ८९ धावांवर रहाणे नाबाद असल्याचे दिसून आले.

रहाणेला तितकीच मोलाची साथ ही शार्दुल ठाकूरनं दिली आहे. त्यानं नाबाद ३६ धावा करत खारीचा वाटा उचलला आहे. बाकीचे सगळे खेळाडू स्वस्तात माघारी जात असताना त्यात रहाणेच्या खेळीनं मात्र टीकाकारांची तोंड गप्प केली आहेत. ज्यांनी रहाणेला या दौऱ्यासाठी ट्रोल केले होते त्यांना रहाणेनं आपली क्षमता दाखवून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT