Lakshya Sen
Lakshya Sen Sakal
क्रीडा

'लक्ष्य'नं रचला इतिहास; प्रकाश पदुकोण, पुलेला गोपिचंद यांची बरोबरी

सकाळ डिजिटल टीम

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य सेन (Lakhsya Sen) याने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत (All England Badminton) नवा इतिहास रचला. पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये त्याने मलेशियाच्या ली जी जिया याला पराभूत करत फायनल गाठली. 21 वर्षानंतर पुरुष गटातून एखादा भारतीय बॅडमिंटनपटूनं या स्पर्धेची फायनल गाठली आहे. जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर असलेल्या सेन याने एक तास 16 मिनिटे चाललेल्या लढतीत 7 व्या क्रमांकावरील जिया याला 21-13, 12-21, 21-19 अशा फरकारने पराभूत केले.

2001 मध्ये पुलेला गोपीचंद यांनी प्रतिष्ठित बीडब्ल्यूएफ सुपर 1000 इवेंटच्या पुरुष एकेरीत फायनल खेळली आणि ती जिंकलीही होती. या दिग्गजानंतर तब्बल दोन दशकानंतर लक्ष्य सेनच्या रुपात भारतीय खेळाडू फायनल खेळताना दिसणार आहे. आतापर्यंत प्रकाश नाथ (1947), प्रकाश पदुकोण (1980 आणि 1981), पुलेला गोपीचंद (2001) आणि सायना नेहवाल (2015) यांच्यानंतर चॅम्पियशिपच्या फायनलमध्ये पोहचणारा तो पाचवा बॅडमिंटन भारतीय खेळाडू आहे. प्रकाश पदुकोण (1981) आणि पुलेला गोपीचंद (2001) या दोघांनीच प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली आहे.

अल्मोडा येथील 20 वर्षीय लक्ष्य सेनने फायनल मारली तर तो ही स्पर्धा जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरेल. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनी ताइपेच्या चाउ टिएन-चेन आणि नंवर वन विक्टर एक्सेलसन यांच्यातील एकासोबत त्याला फायनल खेळावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT