all england open 2024 badminton india day 1 results PV Sindhu in second round HS Prannoy crash out Sakal
क्रीडा

All England Open 2024 : पी. व्ही. सिंधूची आगेकूच; प्रणोय, कश्‍यप सलामीलाच गारद

भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस संमिश्र यशाचा ठरला.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस संमिश्र यशाचा ठरला. एकीकडे प्रतिस्पर्धी खेळाडूने माघार घेतल्यामुळे पी. व्ही. सिंधूला महिला एकेरी विभागाच्या लढतीत आगेकूच करता आली, तर दुसरीकडे एच. एस. प्रणोय व आकर्षी कश्‍यप यांना एकेरी विभागात पराभवाच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले.

दुखापतीवर मात करीत काही दिवसांपूर्वीच बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या पी. व्ही. सिंधू हिच्यासमोर सलामीच्या लढतीत योन ली हिचे आव्हान होते. भारताच्या फुलराणीने पहिला गेम २१-१० असा जिंकत १-० अशी आघाडी मिळवली.

त्यानंतर योन ली हिने माघार घेतली. त्यामुळे सिंधूला या स्पर्धेत पुढे चाल देण्यात आली. आता पुढील फेरीत तिला कोरियाची अव्वल मानांकित ॲन सी यंग हिचा सामना करावा लागणार आहे.

झुंज अपयशी

पुरुषांच्या एकेरीत एच. एस. प्रणोय याने सलामीच्या लढतीत कडवी झुंज दिली; पण त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. सु ली यांग याने प्रणोणचा कडवा संघर्ष तीन गेममध्ये मोडून काढला व पुढे पाऊल टाकले. प्रणोय याने पहिला गेम २१-१४ असा जिंकत आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र यांग याने झोकात पुनरागमन करताना २१-१३, २१-१३ अशी बाजी मारली. प्रणोय याचा एक तास व सात मिनिटांत पराभव झाला.

महिला एकेरीत निराशा

पी. व्ही. सिंधू हिला आगेकूच करता आली असली तरी महिला एकेरीत भारताला निराशेला सामोरे जावे लागले. आकर्षी कश्‍यप हिचे आव्हान संपुष्टात आले. पेई यू पो हिने आकर्षीवर २१-१६, २१-११ असा दोन गेममध्ये विजय मिळवला. तिने आकर्षीवर ३७ मिनिटांत मात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT