All Is Not Well As Yuvraj Singh Posts Cryptic Message To Wish Virat Kohli On His Birthday
All Is Not Well As Yuvraj Singh Posts Cryptic Message To Wish Virat Kohli On His Birthday 
क्रीडा

ऑल इज नॉट वेल; का केलं युवीने विराटसाठी असं ट्विट?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराजसिंग निवृत्तीनंतरही सध्या बराच चर्चेत आहे. त्याला कारण आहे ते म्हणजे तो सातत्याने कोणा ना कोणावर टीका करत आहे. निवृत्तीनंतर काहीच दिवसांत त्याने निवड समितीने त्याच्याशी केलेल्या चुकीच्या वर्तणूकीला वाचा फोडली होती. आता त्याने विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देणार ट्विट केले आहे त्यावरुन या दोघांमध्ये ऑल इज नॉट वेल असंच दिसत आहे. 

युवीने नुकतेच विराटला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मात्र, त्या शुभेच्छा या दोघांमध्ये पूर्वीसारखं सगळं अलबेल राहिलं नसल्याचं सांगून जात आहेत. ''ये भी दिन थे! और एक आज का दिन है! एक त्याकाळचे दिवस होते आणि एक आताचे दिवस आहेत. असो, कुठेही असशील तिथे खूश राहा.'' असे ट्विट त्याने केले आहे. 

युवराजने त्याला 2017ची चॅम्पियन्स करंडक खेळण्यासाठी तयारी करायला सांगितल्याचा खुलासा केला होता. तो यो-यो चाचणीत पास झाला मात्र, त्याचा संघ निवडीच्यावेळी विचार करण्यात आला नाही. 

''मी 36 वर्षांचा असताना मला यो-यो चाचणीसाठी तयारी करण्यास सांगण्यात आले होते. चाचणीत पास झाल्यावरही मला स्थानिक क्रिकेट खेळण्यास सांगितले होते.  त्यांना वाटले माझ्या वयामुळे मी यो-यो चाचणी पास होणार नाही आणि मग मला नाही म्हणायला कारण सापडेल पण तसे झाले नाही.''

त्याने मुकतेच पुन्हा निवड समितीवर टीका केली होती. तसेच आता त्याचया या ट्विटमुळे विराट आणि युवीमध्येही गोष्टी नीट नसल्याचे दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT