Alyssa Healy esakal
क्रीडा

Alyssa Healy : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं सामना गमावला मात्र कर्णधारानं जिंकलं मन; एलिसा हेली होतेय ट्रेंड

पराभूत संघाच्या कर्णधारानं विजयी संघाचा जल्लोष टिपला

अनिरुद्ध संकपाळ

Alyssa Healy Trending After India Women Defeat Australia Women : भारतीय महिला क्रिकेट संघाने आज इतिहास रचला. वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचा हा महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला विजय आहे. त्यामुळे हा विजय हरमन आणि टीमसाठी खूप खास आहे.

या विजयाचा जल्लोष करत असताना ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिका हेली हिने केलेल्या एका कृतीमुळे ती ट्रेंड करत आहे. भारताच्या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसाचेही कौतुक होत आहे.

सामना झाल्यानंतर हरमनने मुलाखत दिली. त्यानंतर मालिका जिंकलेली ट्रॉफी हातात घेऊन हरमनप्रीत कौर संघासोबत जल्लोष करत होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेली हातात कॅमेरा घेऊन विजयी जल्लोष करणाऱ्या संघाचा फोटो काढत होती. एलिसा हेलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

1977 पासून आतापर्यंत झालेल्या भारत - ऑस्ट्रेलिया महिला संघातील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया कधीही पराभूत झाली नव्हती. मात्र एलिसा हेलीच्या नेतृत्वातील संघाला भारताने मात दिली.

एलिसा हेली भारतीय महिला संघाकडून कसोटीत पराभूत होणारी पहिली कर्णधार ठरली आहे. असं असतानाही हेलीने मनाचा मोठेपणा दाखवत विजयी भारतीय संघाचा फोटो काढला. त्यामुळे तिच्याबद्दल ऑस्ट्रेलियाच नाही तर भारतीय संघातील खेळाडूंमध्ये देखील आदराची भावना निर्माण झाली असेल.

एलिसा हेलीने संपूर्ण क्रिकेट जगताला एक मोठा संदेश दिला आहे. खिलाडूवृत्ती काय असते हे तिने बोलून नाही तर कृतीतून दाखवून दिलं. विजयी झाल्यावर सर्वजण खिलाडूवृत्ती दाखवतातच मात्र पराभूत होऊनही अशी कृती करणं नक्कीच कौतुकास्पद आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT