Ambati Rayudu esakal
क्रीडा

Ambati Rayudu : अंबाती रायुडूला बीसीसीआयचा दणका; मेजर लीग क्रिकेटमधील TSK ही नरमली

अनिरुद्ध संकपाळ

Ambati Rayudu BCCI Major League Cricket : भारताचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या फायनलपूर्वीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर रायुडूने अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र बीसीसीआयला हा निर्णय रुचला नाही. त्यामुळे बीसीसीआय निवृत्त खेळाडूंच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत होती.

नुकत्याच झालेल्या एपेक्स काऊन्सीलच्या बैठकीत याबाबत चर्चा देखील झाली. या चर्चेनंतर आता अंबाती रायुडूने एक पाऊल मागे घेतले आहे. त्याने वैयक्तिक कारणाने मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या हंगामातून माघार घेतली आहे. रायुडूने जून महिन्यात आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर लगेचच सीएसकेची सहयोगी फ्रेंचायजी टेक्सास सुपर लीगने करारबद्ध केलं होतं.

यानंतर बीसीसीआयने भारताच्या निवृत्त खेळाडूंसाठी एक कूलिंग ऑफ पीरियड आणण्याचा विचार करण्यास सुरूवात केली. याबाबत 7 जुलैला झालेल्या एपेक्स काऊन्सीलच्या बैठकीत चर्चा देखील झाली. यानंतर टेक्सास सुपर किंग्जने वक्तव्य प्रसिद्ध केले. 'अंबाती रायुडू वैयक्तिक कारणांमुळे टेक्सास सुपर किंग्जकडून एमएलसीच्या पहिल्या हंगामात सहभागी होणार नाहीये.'

मेजर लीग क्रिकेट स्पर्धा 13 जुलै ते 30 जुलै दरम्यान अमेरिकेत होणार आहे. या लीगमध्ये आयपीएलच्या केकेआर, सीएसके आणि मुंबई इंडियन्स या फ्रेंचायजींनी संघ खरेदी केले आहेत.

मेजर लीग क्रिकेट स्पर्धेचा पहिला हंगाम हा भारतात व्हायकॉम 18 या स्पोर्ट्स चॅनलवर दिसणार आहे. तर मल्टी - प्लॅटफॉर्म कव्हरेजनुसार याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे जिओ सिनेमा आणि टीव्हीवरील प्रक्षेपण हे स्पोर्ट्स 18 वर होणार आहे. लीगमधील पहिला सामना टेक्सास सुपर किंग्ज आणि लॉज एजल्स नाईट रायडर्स यांच्यात 13 जुलैला होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

SCROLL FOR NEXT