Ambati Rayudu In Politics
Ambati Rayudu In Politics esakal
क्रीडा

Ambati Rayudu In Politics : अंबाती रायुडूची राजकारणात उडी; आंध्राचा अँग्री यंग मॅन म्हणतो लवकरच...

अनिरुद्ध संकपाळ

Ambati Rayudu In Politics : धोनीचा प्रचंड विश्वास असलेल्या अंबाती रायुडूने आयपीएल 2023 च्या फायनलनंतर आपली बॅट खाली ठेवली. त्याने निवृत्तीची घोषणा करत आपली क्रिकेटिंग कारकीर्द संपल्याचे जाहीर केले. चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्स विरूद्धची फायनल जिंकून रायुडूला विजेतेपदासह निरोप दिला. या घटनेला महिना होतो न होतो तोच अंबाती रायुडूने आपल्या दुसऱ्या इनिंगची घोषणा देखील केली.

अंबाती रायुडूने आंध्र प्रदेशमधील स्थानिक माध्यमांना तो लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात उडी घेणार असल्याचे सांगितले. 37 वर्षाचा रायुडू म्हणाला की, 'मी आंध्र प्रदेशच्या राजकाणात लवकरच प्रवेश करणार आहे.

मात्र त्यापूर्वी मी जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देणार आहे. मला लोकांची भावना आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत.' मुळच्या गुंटूरच्या असलेल्या रायुडूने मुतलुरू गावातील वाट्टीचेरूकुरू या ब्लॉकला भेट दिली. यावेळीच त्याने हे वक्तव्य केले.

रायुडू म्हणला की गुंटूरमधील ग्रामीण भागातील लोकांची माहिती घेण्यासाठी, त्यांच्यासाठी काय करता येईल यासाठी मी हा दौरा करत आहे. रायुडू म्हणाला की मी राजकारणात एक सक्षम अॅक्शन प्लॅन घेऊन येणार आहे. यासाठी कोणतं माध्यम निवडायचं हे देखील ठरवणार आहे.

अंबाती रायुडू गुंटूरमधून 2024 च्या लोकसभा निवडणूक लढवण्याची चाचपणी करतोय अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र अंबाती रायुडूने या शक्यता फेटाळल्या आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: लैगिंक गुन्हातील आरोपी प्रज्वल रेवण्णाला दणका; कर्नाटकातील हसन मतदारसंघातून पराभव

Lok Sabha Election Result: भाजपची धाकधूक वाढली; एक्झिट पोल फेल तर राजकीय विश्लेषकांचे अंदाज गडबडले

Lok Sabha Election Result: काँग्रेस नेतृत्त्वाची नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंशी चर्चा सुरु? दिल्लीत हालचालींना वेग

Amit Shah Lok Sabha: घरच्या मैदानात गृहमंत्र्यांचा विजयी हुंकार! अमित शहांना ३ लाखांपेक्षाही मोठी आघाडी

India Lok Sabha Election Results Live : '400 पार'ला लागलं ग्रहण! यूपी-बंगाल, महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये भाजपसोबत झाला मोठा 'खेळ'

SCROLL FOR NEXT