Choctaw High School football game shooting sakal
क्रीडा

Shooting In Football Match : अमेरिकेत फुटबॉल सामन्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार! पोलीस अधिकारीही सामील, तीन जणांची प्रकृती चिंताजनक

Kiran Mahanavar

Choctaw High School Football Game Shooting : अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून ओक्लाहोमा येथे शुक्रवारी रात्री हायस्कूल फुटबॉल खेळादरम्यान चार जणांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यानेही गोळीबार केला. चोक्टाव हायस्कूल आणि डेल सिटी हायस्कूल यांच्यातील खेळादरम्यान रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

चोक्टाव पोलीस प्रमुख मार्शल यांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, तर इतर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी घटनास्थळावरून पळून गेलेल्या एका संशयिताचा शोध घेतला, परंतु अद्याप त्याला ताब्यात घेतले नाही.

या गोळीबारात एक पोलीस अधिकारीही सामील..

घटनास्थळी किती हल्लेखोर होते याची माहिती मिळालेली नाही. डेल शहराचे पोलिस प्रमुख लॉयड बर्जर म्हणाले की, ऑफ-ड्युटी डेल सिटी अधिकारी गेमला सुरक्षा पुरवत होते. पोलिसांनी सांगितले की, या गोळीबारात एक अधिकारी सामील होता आणि ओक्लाहोमा काउंटी शेरीफ कार्यालय या अधिकाऱ्याच्या गोळीबारातील सहभागाची चौकशी करेल.

या घटनेच्या दोन दिवस आधी कॅलिफोर्नियामध्ये जबरदस्त गोळीबार झाला होता. या हल्ल्यात सुमारे 5 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT