daniil medvedev sakal
क्रीडा

Tennis Grand Sam Tournaments : मेदवेदेव, झ्वेरेवचे टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत आगेकूच

रशियाचा डॅनिल मेदवेदेव आणि जर्मनीचा ॲलेक्झँडर झ्वेरेव यांनी अमेरिकन ओपन या टेनिस ग्रँडस्लॅममधील लढतीत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत पुरुषांच्या एकेरीत आगेकूच केली.

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क - रशियाचा डॅनिल मेदवेदेव आणि जर्मनीचा ॲलेक्झँडर झ्वेरेव यांनी रविवारी पहाटे झालेल्या अमेरिकन ओपन या टेनिस ग्रँडस्लॅममधील लढतीत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत पुरुषांच्या एकेरीत आगेकूच केली. मेदवेदेव याने सेबॅस्टियन बेझ याला, तर झ्वेरेव याने ग्रिगोर दिमित्रोव याला पराभूत करीत पुढे पाऊल टाकले. स्वित्झर्लंडचा अनुभवी टेनिसपटू स्टॅन वावरिंका याचा तिसऱ्या फेरीत पराभव झाला. त्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले.

तिसरा मानांकित मेदवेदेव याने बेझ याच्यावर सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला. मेदवेदेव याने बेझ याला ६-२, ६-२, ७-६ असे दोन तास व ४० मिनिटांमध्ये नमवले. १२ व्या मानांकित झ्वेरेव याच्यासमोर १९ व्या मानांकित ग्रिगोर याचे आव्हान होते. मात्र झ्वेरेव याने त्याचा संघर्ष चार सेटमध्ये मोडून काढला. झ्वेरेवने पहिला सेट ६-७ असा गमावल्यानंतर पुढील तीन सेट ७-६, ६-१, ६-१ असे जिंकत सामना आपल्या नावावर केला. झ्वेरेवने ही लढत तीन तास व ४२ मिनिटांमध्ये जिंकली.

स्पेनचा युवा स्टार कार्लोस अल्काराझ याने २६ वा मानांकित युनायटेड किंगडमच्या डॅनियल इवांस याच्यावर चार सेटमध्ये विजय साकारत जेतेपद राखण्यासाठी पाऊल टाकले.

सबलेंका, पेगुलाची महिला विभागात आगेकूच

महिला विभागात मानांकित खेळाडूंनी आगेकूच केली. दुसरी मानांकित एरीना सबलेंका व तिसरी मानांकित जेसिका पेगुला यांनी प्रतिस्पर्ध्यांना हरवण्याची किमया करून दाखवली. पेगुला हिने एलिना स्वितोलिना हिच्यावर ६-४, ४-६, ६-२ अशी मात केली.

सबलेंका हिने क्लॅरा बुरेल हिच्यावर ६-१, ६-१ असा सहज विजय नोंदवला. या दोघींसह पाचवी मानांकित ओन्स जॅब्यूएर, १७ वी मानांकित मेडिसन किज यांनीही प्रतिस्पर्ध्यांना हरवत कूच केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT