Football Player Proposed His Girlfriend Instagram
क्रीडा

VIRAL VIDEO : फुटबॉलपटून मैदानावरच केलं प्रपोज

फुटबॉलपटूने गर्लफ्रेंडला केलेल्या प्रपोजचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सुशांत जाधव

जग कोरोनातून हळूहळू सावरतेय. बरीच खेळाची मैदाने अनलॉक झाली असून वेगवगळ्या देशात फुटबॉल पर्वालाही सुरुवात झालीये. रविवारी मेजर लीग स्पर्धेत (MLS) सॅन जोस अर्थक्वेक आणि मिनेसोटा एफसी यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत राखण्यात मोलाची कामगिरी केलेल्या मिनेसोटा एफसीच्या डॉटसन स्टीफनसन (Dotson Stephenson) याने सामना संपल्यानंतर मैदानावरच आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर अमेरिकन फुटबॉलपटूने गर्लफ्रेंडला केलेल्या प्रपोजचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (American Football Player Hassani Dotson Stephenson Proposed His Girlfriend On Pitch Video Goes Viral)

या व्हिडिओमध्ये स्टीफनसन गुडघ्यावर बसून सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांसह खेळाडूंसमोरच आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना दिसते. प्रेक्षकांनी बहरलेल्या मैदानात स्टीफनसनची कृती पाहून त्याची गर्लफ्रेंड अवाक् झाल्याचेही पाहायला मिळते. तिने मान हलवत त्याच्या प्रपोजला होकार दिले. त्यानंतर स्टीफनसन याने आपल्या प्रेयसीला अंगठी देखील घातली.

सोशल मीडियावर प्रेमी युगलांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे. नेटकही त्याच्या या अंदाजाला चांगलीच पसंत देत असून खास कमेंटही करत आहेत. फुटबॉलपटू स्टीफनसनची गर्लफ्रेंड पेट्रा वुकोविच (Petra Vukovic) हिने देखील आपल्या इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून फोटो शेअर केलाय. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. मनातील भावना शब्दात व्यक्त करु शकत नाही, या खास ओळींसह तिने हा फोटो शेअर केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Intercity: पुणे-मुंबई इंटरसिटीच्या डबे वाढवण्याला ‘ब्रेक’; फलाट आणि पिट लाइन अपुरी, प्रवाशांना नाहक फटका

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांच्या शेतात याल, तर दरोडेखोरांप्रमाणेच वागणूक देऊन चोप देऊ; राजू शेट्टींचा थेट इशारा

AI Healthcare Breakthrough: जगात पहिल्यांदाच AIच्या मदतीने मेंदूची शस्त्रक्रिया; रुग्णाची दृष्टी वाचवण्यात यश

Marathi News Live Updates : पंकजा मुंडे, आदिती तटकरे यांनी बांधली धनंजय मुंडेंना राखी; भावाने दिला आशीर्वाद

BJP woman leader daughter in law : भाजप महिला नेत्याच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल; अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी, विवाहबाह्य संबंधांचा आरोप

SCROLL FOR NEXT