Serena Williams  
क्रीडा

US Open 2021 :सेरेनाची ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार

39 वर्षीय सेरेना विल्यम्स 24 व्या ग्रँडस्लॅम विजयाच्या प्रतिक्षेत असून ही प्रतिक्षा आणखी लांबणीवर पडलीये.

सुशांत जाधव

US Open 2021 : अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्यम्स हिने अमेरिकन ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. सेरेनाने सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती दिलीये. पायाच्या स्नायू दुखापतीनं त्रस्त असल्यामुळे स्पर्धेत उतरणे शक्य नसल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅमला ती मुकणार आहे.

सहा वेळा अमेरिकन ओपन स्पर्धेत जेतेपद मिळवणाऱ्या सेरेना विम्बल्डन ओपनमध्ये कोर्टवर उतरली. पण पहिल्याच फेरीत दुखापतीमुळे तिच्यावर स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली होती. 39 वर्षीय सेरेना विल्यम्स 24 व्या ग्रँडस्लॅम विजयाच्या प्रतिक्षेत असून ही प्रतिक्षा आणखी लांबणीवर पडलीये. ती ऑलिम्पिकसह सिनसिनाटी ओपन स्पर्धेलाही मुकली होती.

सेरेनाने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक निवेदन शेअर केले आहे. यात तिने लिहिलंय की, दुखापतीसंदर्भात डॉक्टर आणि स्वास्थ टीमसोबत चर्चा केली. दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सेरेनापूर्वी पुरुष गटातून स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल आणि गतविजेता डॉमिनिक थिम या दोघांनी दुखापतीमुळे अमेरिकन ओपन स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

23 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवणारी सेरेना मार्गारेट कोर्ट या दिग्गज महिला टेनिस स्टारच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यापासून एक पाउल दूर आहे. दुखापतीमुळे तिच्या विक्रमात अडथळे निर्माण होताना दिसताहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT