क्रीडा

भारतीय महिला हॉकी संघासमोर अमेरिकेचे आव्हान ; पॅरिस ऑलिंपिक प्रवेशाचा ध्यास

या स्पर्धेमध्ये आठ देशांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अ गटामध्ये चिली, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, जपान हे देश एकमेकांना कडवी झुंज देतील. ब गटामध्ये भारत, इटली, न्यूझीलंड व अमेरिका या चार देशांमध्ये झुंजार लढत पाहायला मिळेल.

सकाळ वृत्तसेवा

रांची : आशियाई स्पर्धेमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यानंतर भारताचा महिला हॉकी संघ मायदेशात होत असलेल्या पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीच्या सलामीच्या लढतीत उद्या (ता. १२) अमेरिकेशी लढणार आहे.

या स्पर्धेमध्ये आठ देशांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अ गटामध्ये चिली, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, जपान हे देश एकमेकांना कडवी झुंज देतील. ब गटामध्ये भारत, इटली, न्यूझीलंड व अमेरिका या चार देशांमध्ये झुंजार लढत पाहायला मिळेल. आठ देशांपैकी तीन देशांचा पॅरिस ऑलिंपिकमधील प्रवेश पक्का होणार आहे. त्यामुळे पात्रता फेरीची ही स्पर्धा आठही देशांसाठी महत्त्वाची असेल. पॅरिस ऑलिंपिकचे आयोजन २६ जुलै ते ११ ऑगस्ट यादरम्यान होईल.

इतिहास अमेरिकेच्या बाजूने

भारत - अमेरिका यांच्यामध्ये १९८३नंतर १५ सामने झाले आहेत. यापैकी ९ सामन्यांमध्ये अमेरिकेने विजय मिळवले आहेत. भारतीय महिला संघाला चारच लढतींमध्ये विजय मिळवता आला आहे. दोन लढती बरोबरीत राहिल्या आहेत. दोन देशांमधील झालेल्या सामन्यांतील निकषावर नजर टाकता अमेरिकेचे पारडे जड आहे. त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाला उद्या प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

आशियाई स्पर्धेतून आम्हाला पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश करता आला नाही. आम्ही ती संधी गमावली. पण आता या बाबीला मागे टाकणार आहोत. रांचीतील पात्रता फेरीच्या स्पर्धेत आम्ही सर्वोत्तम खेळ केल्यास नक्कीच पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरू.

- यानेक शॉपमन,

मुख्य प्रशिक्षक, भारतीय महिला हॉकी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT