Amit Shah MS Dhoni Chennai esakal
क्रीडा

MS Dhoni : अमित शहा - धोनी यांची भेट; सोशल मीडियावर होतोय फोटो व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Amit Shah MS Dhoni : सध्या सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपौकी एक असलेला धोनी हा देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसतो. हा फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी धोनी भाजपमध्ये प्रवेश तर करणार नाही ना अशी शंका बोलून दाखवली.

या व्हायरल होत असलेल्या फोटोत एमएस धोनी हा अमित शहा यांच्याशी हसत हसत हस्तांदोलन करताना दिसतोय. धोनीने फॉर्मल शर्ट आणि पँट घातली आहे. हा फोटो एका सार्वजनिक कार्यक्रमातील आहे. अमित शहा आणि महेंद्रसिंह धोनी हे चेन्नईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एकमेकांना भेटले. हा कार्यक्रम इंडिया सिमेंटच्या 75 व्या स्थापना दिवसाचा होता. ही कंपनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीची आहे. ते चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल संघाचे मालक देखील आहे. धोनी आणि एन. श्रीनिवासन यांची जवळीक सर्वांना माहिती आहेच.

दरम्यान, अमित शहा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या हस्तांदोलनचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी धोनी भाजपमध्ये प्रवेश तर करणार नाही ना अशी शंका देखील व्यक्त केली. या फोटोवरून अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT