amol-muzumdar twitter
क्रीडा

पदार्पणात द्विशतक झळकावणारा माजी क्रिकेटर मुंबईचा कोच

सुशांत जाधव

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) माजी क्रिकेटर अमोल मजूमदार यांना मुंबईच्या कोच म्हणून नियुक्त केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11 हजारहून अधिक धावा करणाऱ्या अमोल मजूमदार यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमसोबत कामाचा अनुभवही आहे. नव्या कोचला वर्षाला 50 लाख रुपये मानधन मिळते. मुंबईच्या कोच पदाच्या शर्यतीमध्ये माजी क्रिकेटर वासीम जाफर यांच्या नावाचाही समावेश होता. जाफर यांना मागे टाकत अखेर अमोल मजूमदार यांनी बाजी मारली. (Amol Muzumdar To Coach Mumbai In 2021-22 season)

माजी क्रिकेटर विनोद कांबली, निलेश कुलकर्णी आणि जतिन परांजपे यांच्या क्रिकेट सुधारणा समितीने (CIC) ने कोच पदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. भारताचा माजी अष्टपैलू आणि अनुभवी कोच बलविंदर सिंह संधू, माजी फिरकीपटू साईराज बहुतुले, मुंबईचे माजी कोच सुलक्षण कुलकर्णी यांनी देखील कोच पदासाठी अर्ज केला होता. अमोल मजूमदार यांना 2021-22 च्या हंगमासाठी कोच म्हणून निवडण्यात आले आहे.

मागील सीझनमध्ये दोन स्पर्धेत दोन कोच

मुंबईचे माजी कॅप्टन मजूमदार यांच्या नेतृत्वाखाली टीमने रणजी ट्रॉफी जिंकली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA), आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स, नीदरलँड टीम आणि दक्षिण अफ्रीका संघाचे फलंदाज कोच म्हणून मजूमदार यांनी काम पाहिले आहे. मुंबईने मागील हंगमात सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अमित पगनिस यांची कोच म्हणून नियुक्ती केली होती. या स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर मुंबईच्या कोच पदी रमेश पोवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबईने त्यांच्या नेतृत्वाखाली विजय हजारे ट्रॉफी उंचावली होती.

अमोल मजूदार यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सुरुवात मुंबईकडून केली. 1993-94 मध्ये पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी 260 धावांची खेळी केली होती. त्यांचा हा रेकॉर्ड 2018 पर्यंत अबाधित होता. 171 सामन्यात 48 च्या सरासरीने त्यांनी 11 हजार 167 धावा केल्या आहेत. यात 30 शतक आणि 60 अर्धशतकाचा समावेश आहे. मुंबईशिवाय अमोल मजूमदार आसाम आणि आंध्र प्रदेश संघाकडूनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT