Amul to sponsor South Africa team ahead of 2nd T20
Amul to sponsor South Africa team ahead of 2nd T20 
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेला भारताची खास मदत, जर्सीवर झळकणार 'ही' भारतीय कंपनी 

वृत्तसंस्था

मोहाली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा संघ एका वेगळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहे आणि याचे कारणही तसेच आहे. आफ्रिकेच्या या जर्सीवर एक भारतीय कंपनी झळकणार आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील  पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. धर्मशाला मैदानावर होणारा सामना पावसामुळे रद्द झाल्याने आता सर्वांचे लक्ष मोहालीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यावर आहे. 18 सप्टेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा ट्वेंटी20 सामना होणार आहे. या सामन्यासाठी अमूल आफ्रिकेला स्पॉन्सर करणार आहे. 

याआधी अमूलने विश्वकरंडक 2019मध्ये अफगाणिस्तानच्या संघाला स्पॉन्सर केले होते. त्यामुळे अमूलनने स्पॉन्सर केलेला दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ आहे. 

अमूलने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी करार केल्याने त्यांच्या जर्सीवर आता अमूलचा लोगो दिसणार आहे. दुग्धजन्य उत्पादकांमध्ये अमूल भारतातील सर्वात मोठी तर जगातली नवव्या स्थानावर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT