Anand Mahindra Car Gift To Praggnanandhaa 
क्रीडा

R Praggnanandhaa : आनंद महिंद्रा ग्रँडमास्टर प्रग्नानंदला भेट म्हणून देणार इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून बसेल धक्का...

Kiran Mahanavar

Anand Mahindra Car Gift To Praggnanandhaa : बुद्धिबळ वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारताचा 18 वर्षीय आर प्रग्नानंद आणि नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रग्नानंदला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत प्रग्नानंद भलेही इतिहास रचण्यास चुकले असतील, पण त्याने करोडो देशवासीयांची मने जिंकली आहेत. आता महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी प्रग्नानंद संदर्भात मोठी घोषणा केली आहे. वास्तविक आनंद महिंद्रा त्याला कार गिफ्ट करणार आहे.

बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा आर प्रग्नानंद हा भारतातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे. आनंद महिंद्राने त्याच्या पालकांना इलेक्ट्रिक कार भेट देण्याची घोषणा केली आहे. या कारचे नाव XUV400 आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. XUV400 कारची किंमत 15 लाख 99 हजार आहे.

बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये18 वर्षीय प्रग्नानंदने सुरुवातीच्या दोन्ही गेममध्ये 32 वर्षीय कार्लसनला कडवी झुंज दिली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रग्नानंद आणि कार्लसन यांच्यातील सामना जवळपास 70 चालीनंतर अनिर्णित राहिला. यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सामना झाला अनिर्णित राहिला. तिसर्‍या दिवशी दोन्ही खेळाडूंमध्ये टायब्रेकर सामना झाला, ज्यामध्ये मॅग्नस कार्लसनने बाजी मारली, पण प्रग्नानंदने आपल्या खेळाने करोडो भारतीयांची मने जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT