West Indies star all-rounder Andre Russell esakal
क्रीडा

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Andre Russell Announces Retirement from International Cricket: जाणून घ्या, रसेल त्याचा शेवटचा सामना कधी खेळणार आहे?

Mayur Ratnaparkhe

West Indies all-rounder ends international cricket career: वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रसेलच्या या निर्णयामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. विंडीज संघाला सात महिन्यांनी टी-२० विश्वचषक खेळायचा आहे,  त्याआधी रसेल सारख्या अष्टपैलू खेळाडूने हा निर्णय घेतल्याने नक्कीच तो त्यांच्यासाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नसणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी रसेलला संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु, तो केवळ पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. तर मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवार, २३ जुलै रोजी सबिना पार्क येथे खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर रसेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणार आहे.

रसेल २०१२ आणि २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. काही काळापूर्वी वेस्ट इंडिजचा स्टार टी-२० खेळाडू निकोलस पूरननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता रसेलच्या निवृत्तीनंतर वेस्ट इंडिज संघ रसेल आणि पूरन सारख्या अनुभवी खेळाडूंशिवाय टी-२० विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. २०२६चा टी-२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे आयोजित केला जाणार आहे.

आंद्रे रसेलने २०१० मध्ये वेस्ट इंडिजकडून पदार्पण केले होते. मात्र त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत तो १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला. तर त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एक कसोटी, ५६ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे.

शिवाय त्याने कसोटीत दोन धावा, एकदिवसीय सामन्यात १०३४ धावा आणि टी-२० मध्ये १०७८ धावा केल्या आहेत. याचबरोबर रसेल याने गोलंदाजीत,  कसोटी सामन्यात एक बळी, एकदिवसीय सामन्यात ७० आणि टी-२० मध्ये ६१ बळी घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dnyaneshwari Munde: परळीच्या बंगल्यावरुन कॉल आला अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप! 18 महिन्यात 8 तपास अधिकारी बदलले, आरोपी मोकाट

'लग्न करणं गरजेचं आहे का?' प्राजक्ता माळीने विचारला होता गुरुंना प्रश्न

Latest Marathi News Updates : पुण्यात आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद

Samosa Health Risks: समोसा आरोग्यासाठी हानिकारक का आहे? जाणून घ्या कारण

Ahilyanagar News : डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे २७ ला अनावरण; मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरांचा ठराव

SCROLL FOR NEXT