Andre Russell WI vs IND T20 Series esakal
क्रीडा

Andre Russell WI vs IND : विंडीजचा स्टार करणार मोठा त्याग... टी 20 मालिकेत भारताची डोकेदुखी वाढणार

अनिरुद्ध संकपाळ

Andre Russell WI vs IND T20 Series : आंद्रे रसेल हा वेस्ट इंडीजचा टी 20 स्टार खेळाडू आहे. मात्र तो वेस्ट इंडीजकडून खेळून आता जमाना उलटून गेला आहे. वेस्ट इंडीजचे क्रिकेट रसातळाला गेले असून त्यांचे जागतिक स्तरावरील दर्जेदार खेळाडू हे फ्रेंचायजी टी 20 क्रिकेट खेळण्यावरच जास्त भर देतात.

मात्र आता अष्टपैलू आंद्रे रसेल हा ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या भारताविरूद्धच्या टी 20 मालिकेत खेळण्यास तयार झाला आहे. त्याने यासाठी आपल्या टी 20 लीगच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याचीही तयारी दर्शवली आहे. विंडीजचा हा स्टार आपल्या देशाची 2024 च्या आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये स्थिती चांगली रहावी अशी इच्छा आहे. (Andre Russell News)

वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाची सध्या मोठी घसरण झाली आहे. एकेकाळी जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा असलेल्या वेस्ट इंडीजला भारतात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपची पात्रता फेरी देखील पार करता आली नाही. मात्र आता 2024 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील अशी परिस्थिती ओढावू नये म्हणून आंद्रे रसेलने आपल्या टी 20 लीगच्या पैशावर पाणी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. (T20 World Cup 2024)

आंद्रे रसेल म्हणाला की, 'मला माहिती आहे की वेस्ट इंडीजकडून खेळण्यासाठी मला काही लीगच्या करारावर पाणी सोडावे लागले. मी हे करायला तयार आहे. मी वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजसाठी उत्तम संधी निर्माण व्हावी यासाठी यासाठी प्रयत्न करणार आहे.' (T20 League)

भारतीय संघ सध्या विंडीज दौऱ्यावर आहे. भारताने पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजचा अवघ्या तीन दिवसात फडशा पाडला. भारताने एक डाव आणि 141 धावांनी समना जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा 20 जुलै रोजी सुरू होणार आहे.

या सामन्यानंतर भारतीय संघ विंडीजविरूद्ध 3 वनडे सामन्यांची आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. टी 20 मालिकेसाठी आंद्रे रसेलने विंडीज संघाकाडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर तो संघात आला तर विंडीजच्या टी 20 संघांची ताकद वाढेल. (West Indies Cricket News)

मात्र आंद्रे रसेलच्या या ऑफरवर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हा स्टार खेळाडू संघात परतेल अशी शक्यता आहे. 2024 मध्ये होणारा टी 20 वर्ल्डकप अवघ्या वर्षावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता संघ बांधणी करण्याची हीच वेळ आहे. मायदेशात भारतासोबत दोन हात करून याची सुरूवात करण्याची ही योग्य वेळ आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT