World Cup 2023 sakal
क्रीडा

World Cup 2023: वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच 'या' संघात भुंकप! कर्णधारने घेतला मोठा निर्णय

Kiran Mahanavar

World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतीय भूमीवर 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यासाठी आतापर्यंत 9 संघ पात्र ठरले आहेत. वनडे विश्वचषक खेळण्याचे प्रत्येक संघाचे स्वप्न असते. मात्र भारतात होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभासाठी आयर्लंडचा क्रिकेट संघ पात्र ठरू शकला नाही. याच कारणामुळे अँड्र्यू बालबर्नीने आयर्लंडच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

आयर्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. आयर्लंड क्रिकेटने याला दुजोरा दिला आहे. 32 वर्षीय बालबिर्नीने 2019 च्या अखेरीस संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्याने 4 कसोटी, 33 एकदिवसीय आणि 52 टी-20 सामन्यांमध्ये आयर्लंड संघाचे नेतृत्व केले आहे. आता त्याच्या जागी पॉल स्टर्लिंगची हंगामी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याने 13 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.

अँड्र्यू बालबर्नीने सांगितले की, खूप विचार केल्यानंतर मी एकदिवसीय आणि टी-20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून या संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी खेळाडू, प्रशिक्षक, क्रिकेट आयर्लंड आणि चाहत्यांचा आभारी आहे.

मला वाटते की, ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे, परंतु मी या संघासाठी माझे सर्वोत्तम कार्य करत राहीन आणि योगदान देण्यासाठी कठोर परिश्रम करेन. पुढील काही वर्षे आमच्यासाठी चांगली जातील अशी आशा आहे धन्यवाद.

झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीत आयर्लंडच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. हा संघ सुपर सिक्समध्येही स्थान मिळवू शकला नाही, त्यांच्या चार गटातील केवळ एक सामना जिंकला. आयर्लंडला ‘ब’ गटात यूएईचा पराभव करण्यात यश आले. पात्रता फेरीत सातव्या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळचा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT