anuja-patil 
क्रीडा

अनुजा पाटीलचे नाबाद शतक  

सकाळवृत्तसेवा

पुणे - हिमाचल प्रदेश, उना येथे सुरू असलेल्या एलिट ‘अ’ व ‘ब’ गटाच्या एकदिवसीय वरिष्ठ महिला गटाच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत अनुजा पाटीलचे नाबाद शतक आणि कर्णधार अनघा देशपांडेने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने हिमाचल संघावर चार गडी राखून विजय प्राप्त करीत चार गुण मिळविले.  

इंदिरा स्टेडिअमवर गुरुवारी झालेल्या या दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राची कर्णधार अनघा देशपांडेने  नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हिमाचल संघाची सुरवात निराशाजनक ठरली. दोन  बाद दोन वरून कर्णधार सुषमा वर्मा आणि नीना चौधरी या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २०३  धावांची भागीदारी केली या जोरावरच हिमाचल संघाला तीन बाद २०८ धावांपर्यंत मजल मारता आली त्यांच्या सुषमा वर्माने १६० चेंडूत पंधरा चौकारासह १०१ धावा केल्या तर नीना चौधरीने १३१ चेंडूत आठ चौकारासह नाबाद ९० धावा केल्या    

प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचेही मुक्ता मगरे आणि शिवाली शिंदे ही सलामीचा जोडी लवकर बाद झाल्याने त्यांची दोन बाद १२ अशी स्थिती झाली होती. मात्र, अनघा देशपांडे आणि अनुजा पाटीलने सुरेख फलंदाजी करत महाराष्ट्राला विजय मिळवून दिला. अनुजा पाटीलने १०५ चेंडूंत अकरा  चौकारांसह नाबाद १०४ धावांची, तर अनघा देशपांडेने ९७ चेंडूंत सहा चौकारांसह ५५ धावांची खेळी केली. अनघा देशपांडे आणि अनुजा पाटील या जोडीने तिसऱ्या विकेटकरिता १०८ धावांची भागीदारी केली होती.  या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सामन्यातून चार गुण मिळविले असून त्यांचा तिसरा सामना त्रिपुरा संघा बरोबर २२ तारखेला होणार आहे. 

संक्षिप्त धावफलक : 
हिमाचल - ३ बाद २०८ (सुषमा वर्मा १०१, नीना चौधरी नाबाद ९०, प्रियांका गारखेडे १-१८, श्रद्धा पोखरकर १-२७) पराभूत विरुद्ध महाराष्ट्र - ६ बाद २०९ (अनूजा पाटील नाबाद १०४, अनघा देशपांडे ५५, तनुजा कन्वर ३-३२, अनिषा अन्सारी २-२२, एन. एम. चौहान १-३७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT