Anurag Thakur Reaction Over Ramiz Raja esakal
क्रीडा

Anurag Thakur : धमकी देणाऱ्या रमीझ राजांना अनुराग ठाकूरांचे चोख प्रत्युत्तर; योग्य वेळ येऊ द्या मग...

अनिरुद्ध संकपाळ

Anurag Thakur Reaction Over Ramiz Raja : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमीझ राजा यांनी शुक्रवारी एक स्फोटक वक्तव्य केलं होते. जय शहा यांनी भारतीय संघ आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही आणि आशिया कप त्रयस्थ ठिकाणी आयोजिक केला जाईल असे ठणकावले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रमीझ राजा यांनी पाकिस्तानचा संघ देखील 2023 चा वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात जाणार नाही अशी भुमिका घेतली. याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्र अनुराग ठाकूर यांनी फक्त एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. मात्र ही प्रतिक्रिया पाकिस्तानला चांगलीच झोंबणारी ठरणार आहे.

रमीझ राजा यांनी एका उर्दू वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, 'भारतात पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने सहभाग घेतला नाही तर तो वर्ल्डकप कोण पाहणार आहे? आमची भुमिका स्पष्ट आहे. जर भारतीय संघ पाकिस्तानात आला तरच आम्ही वर्ल्डकप खेळण्यासाठी जाणार. जर ते आले नाहीत तर त्यांना आमच्याशिवाय वर्ल्डकप खेळावा लागले. आम्ही आक्रमक भुमिका घेतली आहे. आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे.'

रमीझ राजा पुढे म्हणाले की, 'मी कायम सांगतोय की आपल्याला पाकिस्तान क्रिकेटचा आर्थिक स्तर सुधारावा लागले. तो फक्त जर आपण चांगली कामगिरी करत राहिलो तरच होऊ शकते. 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमध्य आपण भारताला पराभूत केलं आहे. आपण आशिया कप टी 20 मध्ये भारताला पराभूत केलं आहे. एका वर्षात पाकिस्तानने लाखो डॉलर्सची इकॉनॉमी असलेल्या संघाला दोनवेळा पराभूत केलं आहे.'

दरम्यान, रमीझ राजांच्या या वादग्रस्त वक्तव्यांवर अनुराग ठाकूर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आल्यावर त्यांनी 'योग्य वेळेची वाट पहा. भारत हा क्रीडा जगतातील एक मोठी शक्ती आहे. कोणताही देश भारताकडे कानाडोळा करू शकत नाही.' रमीझ राजांच्या नव्या स्फोटक वक्तव्यांवर बीसीसीआयच्या कोणत्याही अधिकाऱ्याने अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, जय शहांच्या आशिया कप 2023 चे ठिकाण बदलण्याच्या वक्तव्यावर अजून आशिया क्रिकेट काऊन्सिलची बैठक झालेली नाही.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT