Olympic Games 2036 In India esakal
क्रीडा

Olympic Games : ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी भारत दावेदारी ठोकणार; 'गुजरात'मधील अहमदाबाद असेल होस्ट सिटी

अनिरुद्ध संकपाळ

Olympic Games 2036 In India : भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की भारत 2036 चे आलिम्पिक गेम्स आयोजित करण्यासाठी आपली दावेदारी सादर करणार आहे. याबाबत 2023 च्या सप्टेंबर महिन्यात मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पूर्ण सदस्यांची बैठक होणार आहे. याचवेळी भारत आपल्या दावेदारीचा संपूर्ण रोडमॅप सादर करणार आहे.

अनुराग ठाकूर मुलाखतीत पुढे म्हणाले की, 'भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला ऑलिम्पिक गेम्स भारतात आयोजित करण्यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत करणार आहे. भारतात जर ऑलिम्पिक गेम्सचे आयोजन झाले तर गुजरातमधील अहमदाबाद हे आयोजक शहर असण्याची शक्यता आहे. कारण तेथेच जागतिक दर्जाच्या खेळाबाबतच्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध आहे.

अनुराग ठाकूर म्हणाले की, भारताने 1982 मध्ये आशिया स्पर्धा, 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आता भारत ऑलिम्पिक गेम्स आयोजित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

ठाकूर पुढे म्हणाले की, 'जर भारत जी 20 चे अध्यक्षपद भूषवत असेल तर मला खात्री आहे की सरकार भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या साथीने ऑलिम्पिक गेम्स आयोजित करू शकतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑलिम्पिक गेम्सचे 2032 पर्यंतचे सर्व स्लॉट बूक आहेत. मात्र 2036 चा स्लॉट उपलब्ध आहे. मला आशा आहे की आपण यावर दावेदारी सांगू शकतो भारत आता पूर्णपणे तयार आहे.' (Sports Latest News)

'भारत फक्त ऑलिम्पिक गेम्स आयोजित करणार नाही तर तो भव्य दिव्य करून दाखवणार याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाहीये. जागतिक स्तरावरील मोठी स्पर्धा आयोजित करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारत उत्पादन असो वा सेवा क्षेत्र सर्व ठिकाणी चर्चेत असतो मग क्रीडा क्षेत्रात का नाही. भारत हा 2036 चे ऑलिम्पिक गेम्स आयोजित करण्याबाबत फार गंभीर आहे.'

ऑलिम्पिक गेम्स आयोजिक करण्यासाठी गुजरातच का असे विचारल्यानंतर अनुराग ठाकूर म्हणाले, 'गुजरातने अनेकवेळा ऑलिम्पिक गेम्स आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्याकडे यासाठी पायाभूत सुविधा आहेत. हॉटेल्स, हॉस्टेल्स, विमानतळ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. ते याबाबत गंभीर देखील आहेत. याचबरोबर गुजरात सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यात ऑलिम्पिक गेम्स गुजरातमध्ये आयोजित करण्याचा देखील उल्लेख आहे.'

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT