अनुष्का-विराट 
क्रीडा

अनुष्काच्या ८८ चेंडूत ५२ धावा, विराट कोहलीवरून भन्नाट मीम्स व्हायरल

१० हजार लाईक्स या टि्वटला मिळाले.

दीनानाथ परब

मुंबई: टी २० वर्ल्डकपमध्ये ( T 20 world cup) भारतीय संघ (Indian team) सध्या सुमार कामगिरी करत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते निराश आहेत. या दरम्यान बीसीसीआयच्या (Bcci) एका टि्वटमुळे नेटकऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. या टि्वटवरुन अनेक गंमतीशीर मीम्स व्हायरल झाले आहेत. या टि्वटचा संबंध अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या नावाशी आहे. सध्या टी २० वर्ल्डकप बरोबरच महिलांची अंडर १९ वन डे चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे.

बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन या चॅलेंजर ट्रॉफी क्रिकेट सामन्यातील एक अपडेट दिली. बीसीसीआयने अनुष्का शर्मान ८८ चेंडूत ५२ धावा केल्या असे टि्वट केले होते. या नावामुळे नेटीझन्सचा घोळ झाला. त्यांना ही अनुष्का शर्मा म्हणजे अभिनेत्री आणि कर्णधार विराट कोहलीची पत्नी असल्याचे वाटले. पण प्रत्यक्षात ही अनुष्का शर्मा भारतीय संघातील क्रिकेटपटू आहे.

महिलांच्या चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम ए, टीम बी, टीम सी आणि टीम डी अशी चार संघात विभागणी करण्यात आली आहे. ही अनुष्का शर्मा इंडिया बी ची कॅप्टन आहे. अनुष्का शर्मा ८८ चेंडूत ५२ धावा (पाच चौकर, एक षटकार) इंडिया बी १४०/० असे टि्वट बीसीसीआयने केले होते. हे टि्वट लगेच व्हायरल झाले. १० हजार लाईक्स या टि्वटला मिळाले. नेटीझन्सही जास्त वेळ वाया न दवडता आपल्या गोंधळाला गमतीशीर मीम्स मधुन वाट मोकळी करुन दिली. विराटची खेचणारे अनेक मीम्स पोस्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मिसिंग लिंकनंतर पहिल्यांदाच द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी

Pune BJP Woman Leader: पुण्यातील महिला भाजप नेत्याचं निधन, वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Highway Accident: मुंबई बंगळूर हायवेवर भीषण अपघात, टाटा अल्ट्रोजचा चुराडा; मुंबईच्या दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

पद्मिनी कोल्हापूरे-प्रीती सप्रू रस्त्यावरच कचाकचा भांडल्या; संतापलेल्या पोलिसांनी सुनावलं, Viral Video

Mongoose satire story : मुंगूस आणि पाळलेला माणूस

SCROLL FOR NEXT