Archery World Cup News Marathi sakal
क्रीडा

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Kiran Mahanavar

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका पाहिला मिळत आहे. भारतीय पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदके जिंकली आहेत.

भारतीय महिला कंपाउंड संघाने इटलीचा 236-225 असा पराभव केला. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि प्रनीत कौर या भारतीय तिघेने सहाव्या मानांकित इटलीचा मोठ्या फरकाने पराभव केला.

पुरुष संघात अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश एफ यांनी नेदरलँड्सचा 238-231 असा पराभव केला.

नेदरलँड संघात माइक श्लोसर, सिल पीटर्स आणि स्टीफ विलेम्स यांचा समावेश होता. सहा बाणांच्या पहिल्या सेटमध्ये ज्योती, अदिती आणि प्रनीत यांनी केवळ दोनदा 10 गुण गमावले. आणि या तिघांनी मार्सेला टोनिओली, इरेन फ्रँचिनी आणि एलिसा रोहनर या इटालियन त्रिकुटावर सुरुवातीला 178-171 अशी आरामदायी आघाडी घेतली.

शेवटी भारतीय खेळाडूंनी दोन गुण गमावले, परंतु त्याचा फारसा फरक पडला नाही आणि त्यांनी 11 गुणांच्या फरकाने सुवर्णपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT