Archery World Cup 
क्रीडा

झुकेगा नहीं साला! नेमबाजीत भारताची 'सुवर्ण' कामगिरी

तिरंदाजी विश्वकरंडक : एकूण पाच पदकांसह केली स्पर्धेची सांगता

सकाळ ऑनलाईन टीम

Archery World Cup: भारतीय पुरुष कंपाउंड तिरंदाजी संघाने शनिवारी दक्षिण कोरियातील ‘ग्वांगझू’ येथे खेळल्या जात असलेल्या विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत पिछाडीवरून पुनरागमन करताना फ्रान्सचा दोन गुणांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले. अशाप्रकारे भारतीय कंपाउंड तिरंदाजांनी शनिवारी एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझ जिंकून पाच पदकांसह दुसऱ्या टप्प्यातील आपली मोहीम पूर्ण केली; तर भारताच्या रिकर्व्ह संघाला एकमेव ब्राँझवर समाधान मानावे लागले.(indian mens compound team won gold)

अभिषेक वर्मा, अमन सैनी आणि रजत चौहान या तिसऱ्या मानांकित कंपाउंड त्रिकूट सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते; परंतु त्यांनी तिसऱ्या फेरीत चमकदार कामगिरी करताना फ्रान्सच्या ॲड्रियन गोंटियर, जीन-फिलिप बलोच आणि केंटीन ब्राउअर यांचा २३२-२३० असा पराभव करून विश्वकरंडक सुवर्णपदकाचा दुसरा टप्पा जिंकला. एप्रिलमध्ये ‘अंतल्या’ येथे झालेल्या शेवटच्या विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत याच भारतीय त्रिकुटाने फ्रान्सचा एका गुणाने पराभव केला होता.

भारताचा स्टार कंपाउंड तिरंदाज अभिषेक वर्माने अवनीत कौरसह मिश्र सांघिक स्पर्धेत भाग घेताना अमिरकान हाने आणि आयसे बेरा सुजेर या तुर्की जोडीचा १५६-१५५ असा पराभव करून ब्राँझपदक जिंकले. अवनीत कौरसाठी हे तिचे दुसरे ब्राँझ होते. तिने यापूर्वी महिलांच्या स्पर्धेत सांघिक ब्राँझपदकाला गवसणी घातली होती.

पदार्पणातच मोहनचे यश

जागतिक क्रमवारीत २२३ व्या क्रमांकावर असलेल्या मोहन भारद्वाजने गेल्या महिन्यातच विश्वकरंडकात पदार्पण केले होते. त्याने जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रियाच्या निको विनरला उपांत्य फेरीत १४३-१४१ ने मागे टाकून त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय नोंदवला. अंतिम फेरीत मात्र त्याला जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नेदरलँड्सच्या माइक श्लोसरकडून १४९-१४१ असे पराभूत व्हावे लागले.

  • ''या मोसमात आमचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. आम्ही तुर्कीमध्ये सर्वोत्तम होतो आणि आम्ही ते पुन्हा सिद्ध केले. त्यामुळे आम्ही आज आनंदी आहोत.''

    - अभिषेक वर्मा

  • ''आम्हाला फ्रान्सची रणनीती माहीत होती आणि त्यांच्या क्षमतेचीही जाणीव होती. तिसऱ्या फेरीनंतर आम्ही रणनीती बदलली आणि त्याचा आम्हाला फायदा झाला.''

    - रजत चौहान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT