Archery World Cup sakal
क्रीडा

Archery World Cup : प्रथमेश, अवनीत पदकापासून एक पाऊल दूर

एकीकडे रिकर्व्ह प्रकारातील सांघिक गटात अपयश आले असताना कंपाऊंड प्रकारात भारतीयांनी अचूक बाण सोडला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - प्रथमेश जावकर व अवनीत कौर या भारतीय तिरंदाजांनी शंघाय येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी विश्‍वकरंडकात (स्टेज टू) शानदार कामगिरी करीत वैयक्तिक कंपाऊंड प्रकाराची उपांत्य फेरी गाठली. दोघांनीही अंतिम फेरीत प्रवेश केल्यास वैयक्तिक प्रकारात त्यांना पहिलेवहिले पदक जिंकता येणार आहे.

एकीकडे रिकर्व्ह प्रकारातील सांघिक गटात अपयश आले असताना कंपाऊंड प्रकारात भारतीयांनी अचूक बाण सोडला. १९ वर्षांच्या प्रथमेश याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दक्षिण कोरियाच्या योंगही चोई याच्यावर १४९-१४८ अशी मात केली आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. आता त्याच्यासमोर इस्तोनियाच्या रॉबिन जातमा याचे आव्हान असणार आहे.

१८ वर्षीय अवनीत हिने अव्वल मानांकित कोरियाची ओह युह यून हिच्यावर रोमहर्षक विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतर अवनीत हिने मेक्सिकोच्या डॅफने क्विनटेरो हिच्या च्यावर १४७-१४४ अशी मात केली आणि पदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी; ५ ते ६ किमीपर्यंत रांग

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT