roy and ridhi phor win gold medal sakal
क्रीडा

World Cup Stage-1: भारताकडे दोन सुवर्णपदक; तरुणदीप-रिद्धीने तीरंदाजीत मारली बाजी

तिरंदाजी विश्वचषक स्टेज-1 च्या रिकर्व्ह मिश्र सांघिक स्पर्धेत भारतानी जिंकले सुवर्णपदक

Kiran Mahanavar

अंताल्या : तिरंदाजी विश्वचषक स्टेज-1 च्या((Archery World Cup Stage 1) रिकर्व्ह मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या तरुणदीप रॉय आणि रिद्धी फोर यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. रविवारी अंटाल्या (तुर्की) येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने ग्रेट ब्रिटनचा पराभव केला. पहिल्यांदा जोडी म्हणून खेळताना, दोन वेळचे ओलिंपियन राय आणि तरुण रिद्धी ०-२ आणि नंतर २-४ ने पिछाडीवर होते पण भारतीय तोडीने संयम राखला 5-4 (35-37, 36-33, 39-40, 38-37). त्यानंतर शूटऑफमध्ये भारतीय जोडीने 18-17 असा विजय मिळवला.(Roy And Ridhi Phor Win Gold Medal)

भारतीय जोडीने सुरुवातीचा सेट 35-37 असा गमावला, परंतु ब्रिओनी पिटमन आणि अॅलेक्स वाईज या ब्रिटीश जोडीने दुसऱ्या सेटमध्ये खराब फटकेबाजी करत भारतीय खेळाडूंनी दुसरा सेट 36-33 असा जिंकला. यानंतर ब्रिटीश तिरंदाजांनी पुनरागमन करत तिसरा सेट ४०-३९ असा जिंकला. अंतिम सेटमध्ये चुकीचा फटका ब्रिटीश तिरंदाजांना महागात पडला, त्यामुळे भारतीय संघाने अंतिम सेट 38-37 असा जिंकला आणि सामना शूट-ऑफमध्ये आणला. शूट-ऑफमध्ये, भारतीयांनी 2-9 केले, तर ब्रिटीश खेळाडू 9 आणि 8 ठोकू शकले.

तिरंदाजी विश्वचषक स्टेज-I मधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि अमन सैनी यांच्या पुरुष कंपाउंड संघालाही सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळाले होते. अंतिम फेरीत भारतीय त्रिकुटाने जीन-फिलिप बौल्च, क्वेंटिन बेरियर आणि अॅड्रियन गोंटियर या फ्रेंच त्रिकुटाचा एका गुणाने पराभव केला. तसे अंतिम फेरीत भारतीय त्रिकुटाची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्या फेरीत ते ५६-५७ असे मागे राहिले.

दुसऱ्या फेरीत फ्रान्सने 60 आणि भारताने 59 स्कोर केल्या आणि 113-116 अशी आघाडी घेतली. त्यानंतर तिसऱ्या फेरीत भारताने 60 स्कोर केल्या आणि तिसरा सेट 60-58 असा जिंकला. चौथ्या आणि शेवटच्या फेरीत भारताने 59 आणि फ्रान्सने 57 स्कोर केल्या, त्यामुळे भारतीय संघाने फ्रान्सला मागे टाकले. सामना संपल्यानंतर भारताची स्कोरसंख्या 173 तर फ्रान्सची 174 अशी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT