क्रीडा

अर्जेंटिना प्रशिक्षक बुझांची हकालपट्टी

सकाळवृत्तसेवा

ब्यूनोस आयर्स - रशियात पुढील वर्षी होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी अपात्रतेच्या उंबरठ्यावर असलेल्या अर्जेंटिनाने प्रशिक्षक एडगार्डो बुझा यांची हकालपट्टी केली. होर्गे साम्पाओली नवे प्रशिक्षक असण्याची शक्‍यता अर्जेंटिनाच्या प्रसिद्धिमाध्यमांनी व्यक्त केली आहे.

साम्पाओली यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली नसली, तरी ते नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. 2015 मधील कोपा अमेरिकन स्पर्धेत ते चिलीचे प्रशिक्षक होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिलीने कोपा लिबर्टाडोरेस विजेतेपद मिळवले होते.

आम्ही बुझा झांबरोबर असलेला करार संपुष्टात आणला आहे, असे अर्जेंटिना फुटबॉल संघटनेचे नवे अध्यक्ष क्‍लाऊडियो तापैया यांनी सांगितले. दक्षिण अमेरिका गटात अर्जेंटिना सध्या पाचव्या स्थानी आहे. स्पर्धेतील चार सामने शिल्लक असून, हुकमी खेळाडू लिओनेल मेस्सीवर चार सामन्यांची बंदी आहे. या गटातून पहिले चार संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत; तर पाचव्या क्रमांकाचा संघ ओशियाना गटातील संघाविरुद्ध "प्ले-ऑफ'मध्ये पात्रतेसाठी खेळेल.

यंदाच्या पात्रता स्पर्धेत बुझा यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जेंटिनाने आठ सामन्यांपैकी तीन विजय, दोन बरोबरी आणि तीन पराभव अशी कामगिरी केली आहे. साम्पाओली सध्या सेव्हिला या क्‍लबचे प्रशिक्षक आहेत. अर्जेंटिनाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याकडे 31 ऑगस्टपर्यंत वेळ असेल. अर्जेंटिनाचा पात्रता स्पर्धेतील पुढील सामना उरुग्वेविरुद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT