Lionel Messi  X/FIFAWorldCup
क्रीडा

Copa America 2024: मेस्सी करणार अर्जेंटिनाचे नेतृत्व, कोपा अमेरिका स्पर्धेसाठी संघाची घोषणा

Lionel Messi: कोपा अमेरिका 2024 स्पर्धेसाठी अर्जेंटिना संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Argentina Squad: अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने आगामी कोपा अमेरिका स्पर्धेसाठी प्राथमिक 29 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. अर्जेंटिना फुटबॉलने दिलेल्या माहितीनुसार दोन आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामने आणि कोपा अमेरिका 2024 स्पर्धेसाठी ही संघाची घोषणा करण्यात आली आहे.

अर्जेंटिना संघाचे नेतृत्व लिओनल मेस्सीकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे 21 जूनपासून सुरु होणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धेतही पुन्हा एकदा मेस्सी नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच 9 आणि 12 जून रोजी अनुक्रमे इक्वाडोर आणि ग्वाटेमाला संघांविरुद्ध होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यातही मेस्सी अर्जेंटिनाचे नेतृत्व करणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मैत्रीपूर्ण सामन्यानंतर 29 जणांच्या संघातून 3 जणांचे नाव कमी करण्यात येतील आणि 26 जणांचा संघ जाहीर होईल. गतविजेते अर्जेंटिना कोपा अमेरिका स्पर्धेत फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेतील प्रतिस्पर्ध्यांचाही सामना करणार आहेत.

अर्जेंटिना संघात लिसांद्रो मार्टिनेझचाही समावेश करण्यात आला आहे. त्याला याआधी बराच काळ दुखापतीमुळे मैदानातून दूर रहावे लागले होते. याशिवाय या संघात एमिलियानो मार्टिनेझ, जेरोनिमो रुली आणि फ्रँको अरमानी या गोलरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर अलेक्झँड्रो गार्नेको याला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात संधी देण्यात आली आहे. लॉटारो मार्टिनेज, ज्युलियन अल्वारेज यांचाही संघात समावेश आहे. तसेच एंजल डी मारिया हा देखील अर्जेंटिना संघात असून तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीचा शेवट कोपा अमेरिका स्पर्धेत करणार आहे.

असा आहे अर्जेंटिनाचा संघ

  • गोलरक्षक - फ्रँको अरमानी, जेरोनिमो रुली, एमिलियानो मार्टिनेझ

  • डिफेंडर्स - गोन्झालो मॉन्टिएल, नहुएल मोलिना, लिओनार्डो बालेर्डी, क्रिस्टियन रोमेरो, जर्मन पेझेला, लुकास मार्टिनेझ क्वार्टा, निकोलस ओटामेंडी, लिसांद्रो मार्टिनेझ, मार्कोस अकुना, निकोलस टॅगलियाफिको , व्हॅलेंटीन बारको

  • मिडफिल्डर - गुइडो रॉड्रिग्ज, लिएंड्रो परेडेस, ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टर, रॉड्रिगो डी पॉल, एक्क्विएल पॅलासिओस, एन्झो फर्नांडीझ, जिओवानी लो सेल्सो.

  • फॉरवर्ड्स - एंजल डी मारिया, व्हॅलेंटीन कार्बोनी, लिओनेल मेस्सी, एंजल कोरिया, अलेक्झँड्रो गार्नेको, निकोलस गोन्झालेझ, लॉटारो मार्टिनेझ, ज्युलियन अल्वारेझ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT