arjun tendulkar-and-jemimah-rodrigues 
क्रीडा

Arjun Tendulkar Jemimah Rodrigues: "अंडर 12 ते आज..." अर्जुन तेंडुलकर सोबतच्या नात्याचा जेमिमाने केला मोठा खुलासा

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Kiran Mahanavar

Arjun Tendulkar and Jemimah Rodrigues : सध्या भारतीय संघात होत असलेल्या नवीन बदलांची बरीच चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये संघात नवीन खेळाडूंना संधी देण्याचा मुद्दा सर्वात आधी येतो. त्यातच सोशल मीडियावर सध्या एका खेळाडूबद्दल टीम इंडियामध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे अश्या अनेक चर्चा होत आहेत.

या खेळाडूबद्दल असे बोलले जात आहे की त्याला लवकरच टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते. यासोबतच या खेळाडूचे जेमिमा रॉड्रिग्जसोबत खास नात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हे प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

अलीकडेच भारतीय महिला क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने अर्जुन तेंडुलकरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. जेमिमा रॉड्रिग्सने या पोस्टमध्ये नमूद केले की, ती आणि अर्जुन तेंडुलकर दोघेही आता एक दशकाहून अधिक काळ एकत्र क्रिकेट खेळत आहेत.

जेमिमाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन्ही खेळाडू एकत्र दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टीही आहेत. जेमिमाचा हा फोटो शेअर करताना हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. हा व्हायरल फोटो दोघांच्या मॅच प्रॅक्टिसनंतर काढण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर अर्जुन तेंडुलकरसोबतचा एक फोटो शेअर करताना जेमिमा रॉड्रिग्जने कॅप्शनमध्ये लिहिले की, "अंडर-12 दिनों से लेकर अब तक… हम एक लंबा सफर तय कर चुके हैं।”.

दोन्ही खेळाडू सध्या त्यांच्या पुढच्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर अर्जुन टीम इंडियामध्ये पदार्पण करण्याची वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्ट्सवरून असा दावा केला जात आहे की, त्याला आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत संधी दिली जाऊ शकते. अर्जुनने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत 4 सामन्यात एकूण चार विकेट घेतल्या. जेमिमा रॉड्रिग्ज तिच्या आगामी सामन्यांसाठी जोरदार तयारी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : विद्युत शॉक लागून होतकरू तरुणाचा मृत्यू; खानापुरातील घटना

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT