क्रीडा

Arjun Tendulkar: रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरने केला धमाका; ठोकले धडाकेबाज अर्धशतक

Kiran Mahanavar

Arjun Tendulkar : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मंगळवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रणजी ट्रॉफीचा 2022-23 हंगाम मंगळवारपासून सुरू झाला आहे, ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर गोवा संघाकडून खेळण्यासाठी आला आहे. अर्जुन तेंडुलकरने या हंगामापूर्वी मुंबई सोडून गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला होता.

गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी निवडली. 23 वर्षीय अर्जुन तेंडुलकरचा येथे प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याने राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात स्फोटक फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. तो सध्या मैदानात असून शतकाच्या वाटेवर आहे. सध्या त्याने 81 धावा केल्या आहेत.

अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू यापूर्वी मुंबई संघाचा भाग होता, पण त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. नंतर तो गोवा संघात सामील झाला आणि सोमवारी त्याला रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मंगळवारी म्हणजेच आज संघाची 5वी विकेट पडल्यानंतर तो मैदानावर उतरला आणि त्यानंतर त्याने अनुभवी फलंदाजाप्रमाणे विरोधी संघावर आक्रमण करण्यास सुरुवात केली.

अर्जुनने आपले अर्धशतक काही वेळात पूर्ण केले. तत्पूर्वी गोवा संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर सुमिरन आमोणकर 9 धावा करून बाद झाला, तर दुसरी विकेट अमोघ देसाईच्या रूपाने पडली. त्याला 27 धावा करता आल्या. यानंतर सुयश प्रभुदेसाईने आघाडी घेतली आणि स्नेहलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. यानंतर अर्जुन तेंडुलकर मैदानावर आला. त्याने आणि सुयशने संघाला 300 पार करून दिली. सध्या दोघेही खेळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT