arshdeep singh ind vs pak meme sakal
क्रीडा

Ind Vs Pak : 'हा कॅच शोलेच्या ठाकूरने पण घेतला असता' पराभवानंतर मिम्सचा पाऊस

पाकिस्तानने भारतावर विजय मिळवताच भारतीय क्रिकेट चाहत्याने अर्शदीपला प्रचंड ट्रोल केले

Kiran Mahanavar

आशिया कप 2022 च्या सुपर-4 फेरीत भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. दुबईत रविवारी झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने 5 विकेट्सने विजय मिळवला. सामन्याच्या एका टप्प्यावर भारताला पुनरागमनाची संधी होती, पण अर्शदीप सिंगने आसिफ अलीचा अतिशय सोपा झेल सोडला. 18 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हा कॅच ड्रॉप सामन्याचा टर्निंग पॉइंट मानला गेला. पाकिस्तानने भारतावर विजय मिळवताच भारतीय क्रिकेट चाहत्याने अर्शदीपला प्रचंड ट्रोल केले.

आशिया कप सुपर 4 च्या भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुलने धडाकेबाज सुरूवात करून देत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र त्यानंतर हारिस रौऊफने रोहितला 28 तर शादाब खानने केएल राहुलला 28 धावांवर बाद करत भारताला दोन धक्के दिले. गेल्या सामन्यातील स्टार सूर्यकुमार यादव देखील 13 धावांची भर घालून परतला. हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला, तर ऋषभ पंत केवळ 14 धावा करू शकला. या दोन्ही फलंदाजांना सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही बळी पडावे लागले.

पंत-पांड्या बाद झाल्यानंतर विराट कोहलीने षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर विराट कोहली 20 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 44 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. विराटनंतर आलेल्या रवी बिश्नोईने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार मारत भारताला 20 षटकात 181 धावांपर्यंत पोहचवले.

भारताने ठेवलेल्या 182 धावांचे आव्हान पार करताना पाकिस्तानने पॉवर प्लेमध्ये सावध सुरूवात केली. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 51 चेंडूत झुंजार 71 धावा केल्या. तर त्याला मोहम्मद नवाजने 20 चेंडूत 42 धावा करून सामना जिंकून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

SCROLL FOR NEXT