Arshdeep Singh Trolled
Arshdeep Singh Trolled sakal
क्रीडा

Ind Vs Pak : 'तू शेर है और रहेगा...' अर्शदीपच्या समर्थनार्थ दिग्गजांची बॅटिंग

Kiran Mahanavar

Arshdeep Singh Trolled IND vs PAK Asia Cup 2022 : भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. त्याचे कारण म्हणजे रविवारी आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत त्याने पाकिस्तानविरुद्ध सोडलेला झेल. मात्र त्याच्या समर्थनार्थ लोकही कमी नाहीत. क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा देत आहे. आकाश चोप्राने ट्विटरवर त्याचे प्रोफाइल पिक्चरही बदलला आहे.

दुबईतील सामन्यात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीपने आसिफ अलीला एक सोपा झेल सोडताना जीवदान दिले. डावाच्या 18 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शॉर्ट थर्ड मॅनवर अर्शदीपने झेल सोडला. तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या 4 बाद 151 अशी होती. आसिफने 8 चेंडूत 16 धावा केल्या, ज्याला नंतर अर्शदीपने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर पंजाबचा 23 वर्षीय अर्शदीप सिंग सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले पण त्याच्या समर्थनात अनेक खेळाडू समर्थन करत समोर आले आहेत.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीही या सामन्यानंतर त्याच्याबद्दल बोलला होता. त्यानंतर भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने या युवा गोलंदाजाचे समर्थन केले आहे. त्याने ट्विटरवर त्याचे प्रोफाइल पिक्चर बदलून अर्शदीपला पाठिंबा दिला आहे. याशिवाय चोप्राने अर्शदीप सिंगबद्दल कु या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्टही केली आहे. त्याने लिहिले की, कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही. जे काही घडते, ते चुकून घडते. खासकरून जर सामना पाकिस्तानविरुद्ध असेल तर नक्कीच दुखावतो.

अर्शदीप प्रथमच आशिया कपमध्ये खेळत आहे. आतापर्यंत केवळ 9 टी-20 सामन्यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. अर्शदीपने याच वर्षी भारताकडून टी-20 पदार्पण केले. साखळी टप्प्यातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 2 बळी घेतले. त्याचवेळी हाँगकाँगविरुद्ध तो महागडा ठरला आणि त्याने 1 बळी घेतला. गेल्या सामन्यातही त्याने 27 धावांत 1 बळी घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT