esakal
क्रीडा

किती खोलवर जखम...मुंबई इंडियन्ससाठी Pollard ची इमोशनल पोस्ट

आयपीएल संपल्यानंतर कायरन पोलार्ड झाला इमोशनल.

धनश्री ओतारी

नुकतंच आयपीएल १५ वा सीझनची सांगात झाली. ५ वेळा चॅम्पियन असणारा मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या वर्षी फ्लॉप ठरला. खराब कामगिरीमुळं चर्चेत असणारा मुंबई इंडियन्स संघ सध्या कायरन पोलार्डमुळं चर्चेत आला आहे. आयपीएल संपल्यानंतर त्याने आपल्या संघासाठी इमोशनल पोस्ट लिहली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्स पुढील सीझनमध्ये जोरदार पुनरागमन करेल, असे किरॉन पोलार्डने चाहत्यांना सांगितले आहे. याशिवाय पोलार्डने आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी गुजरात टायटन्स आणि गेल्या मोसमापर्यंत मुंबईचा भाग असलेला संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याचेही अभिनंदन केले.

मुंबई इंडियन्सकडून खेळतानाचे काही फोटो पोलार्डने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने इमोशनल कॅप्शनदेखील दिली आहे.

''जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला एक संघ म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आमच्यासाठी निराशाजनक हंगाम दिसतो. त्यामुळे किती खोलवर दुखापत झाली आहे. हे केवळ आम्हाला माहीत आहे.

तसेच तो पुढे म्हणाला, २०२२ मध्ये आम्ही खुप काही शिकलो. ते आम्हाला संघ म्हणून किंवा व्यक्ती म्हणून परिभाषित करते, नाही ना. आपल्याला जीवन आणि गोष्टी बदलण्याची संधी आहे हे जाणून आपण ताठ मानेने चालले पाहिजे. असे सांगत आम्ही या सीझनला निरोप देत असल्याचे पोलार्डने म्हटलं आहे.

यासोबतच त्याने हार्दिक पांड्या आणि गुजरातचे खेळाडू चांगले खेळले असं म्हणत अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT