क्रीडा

Ashes : ऑस्ट्रेलियाला धक्का; कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या कसोटीला मुकला

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला रेस्टॉरंटला जेवायाला जाणं महागात पडलं असून तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी स्मिथकडे कर्णधार पद सोपवण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia) यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस कसोटी (Ashesh Test Series) मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) अॅडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं त्याला ७ दिवस क्वारंटाइन रहावं लागणार आहे. याबाबतची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) दिली असून पॅट कमिन्सनेसुद्धा एक निवेदन दिलं आहे. पॅट कमिन्स दुसऱ्या कसोटीला मुकणार असला तरी पुढच्या कसोटीत तो खेळेल असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला आहे.

पॅट किमिन्सने दिलेल्या माहितीनुसार, पॅट कमिन्स जेवायला एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तिथे त्याने कोणथेही बायोसिक्युरिटी प्रोटोकॉलच्या नियमांचे उल्लंघन केले नाही. मात्र परिस्थिती लक्षात येताच त्यानं स्वत:हून आयसोलेट होणं पसंत केलं. तसंच कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

कमिन्स ज्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे कमिन्सला ७ दिवस क्वारंटाइन रहावं लागणार आहे. यामुळे त्याला अॅशेस कसोटी मालिकेतील अॅडलेडमध्ये होणाऱ्या सामन्यात खेळता येणार नाही. आता कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टिव स्मिथकडे (Steve Smith) कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

पॅट कमिन्स संघात नसल्यानं त्याच्या जागी मिशेल नेसर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे. विशेष म्हणजे त्याचा हा कसोटी पदार्पणाचा सामना ठरणार आहे. ट्रॅविस हेड हा उपकर्णधार असणार आहे. कमिन्ससह मिशेल स्टार्क (Mitchel Starc) आणि नाथन लायन (Nathan Lyan) हेसुद्धा त्याच रेस्टॉरंटमध्ये होते. मात्र ते दोघेही वेगळ्या टेबलवर बसले होते. ते संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आले नव्हते त्यामुळे ते खेळू शकतात असंही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT