England vs Australia 4th Test  sakal
क्रीडा

कसोटी सामन्यासाठी Playing 11 ची घोषणा! 'या' खेळाडूला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

Kiran Mahanavar

England vs Australia 4th Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे, मात्र पहिले दोन सामने गमावल्यानंतर इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन केले आणि सामना तीन विकेटने जिंकला.

तिसऱ्या सामन्यात मार्क वुडने इंग्लंडकडून चांगली कामगिरी केली आणि त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने सामना जिंकला. आता इंग्लंड संघाने चौथ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. यामध्ये एका स्टार खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

संघात केला हा बदल

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 19 जुलै रोजी खेळल्या जाणार आहे, मात्र त्याआधी इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. जेम्स अँडरसनला संघात परत बोलावण्यात आले आहे. त्याचवेळी तिसऱ्या कसोटीत खराब कामगिरी करणाऱ्या ओली रॉबिन्सनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अँडरसनकडे प्रचंड अनुभव आहे, जो इंग्लंड संघासाठी उपयोगी पडू शकतो. अँडरसनने आतापर्यंत कसोटी सामन्यात 686 विकेट घेतल्या आहेत.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एक बदल केला आहे. सलामीसाठी त्याने बेन डकेट आणि जॅक क्रॉलीवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज जो रूटकडून इंग्लंडला पुन्हा चांगल्या कामगिरीची आशा असेल.

इंग्लंडकडे आता वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. ज्यात जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड यांचा समावेश आहे. त्याचवेळी मोईन अली फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळताना दिसल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग-11 :

बेन डकेट, जॅक क्रॉली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, ख्रिस वोक्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT