Travis Head esakal
क्रीडा

Ashes | AUS vs ENG : हेडकडून धुलाई; दिवसअखेर १९६ धावांची आघाडी

ट्रॅव्हिस हेडने ठोकले ८५ चेंडूत ठोकले शतक

अनिरुद्ध संकपाळ

ब्रिसबेन : अॅशेस मालिकेतील पहिल्या गाबा कसोटीत दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३४३ धावांपर्यंत मजल मारली. दिवस अखेर कांगारुंनी इंग्लंडवरील आपली आघाडी १९६ धावांपर्यंत नेली. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ९४ धावांची खेळी केली तर ट्रॅव्हिस हेडने आक्रमक शतक ठोकत इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तो दिवसअखेर ११२ धावा करुन नाबाद होता. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सनने चांगला स्पेल टाकत ३ कांगारु टिपले.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्याच दिवशी 147 धावात गुंडाळले होते. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने भेदक मारा करत इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला होता. इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर पावसाने सुरुवात केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आपला पहिला डाव सुरु करता आला नव्हता.

ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ३४३ धावांपर्यंत मजल, हेडच्या नाबाद ११२ धावा

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्स १२ धावा करुन परतला पॅव्हेलियनमध्ये

ट्रॅव्हिस हेडने ठोकले ८५ चेंडूत शतक, ऑस्ट्रेलियाने पार केला ३०० चा टप्पा

ऑस्ट्रेलियाच्या ६५ षटकात ६ बाद २३६ धावा

पदार्पण करणारा अॅलेक्स कॅरीही १२ धावांची भर घालून माघारी परतला.

रॉबिन्सनचा कांगारुंना तिसरा धक्का, कॅमेरुन ग्रीन शुन्यावर बाद. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 195 धावांवर माघारी.

रॉबिन्सनचा भेदक मारा, डेव्हिड वॉर्नरचे शतक अवघ्या 6 धावात हुकले

स्टीव्ह स्मिथकडून निराशा 12 धावांची भर घालून परतला माघारी

अखेर वॉर्नर (David Warner) - लॅम्बुशग्ने जोडी फोडण्यात इंग्लंडला यश; जॅक लिचने मार्नस लॅम्बुशग्नेला 74 धावांवर केले बाद

वॉर्नर (David Warner) - लॅम्बुशग्नेची दीडशतकी भागीदारी, ऑस्ट्रलेयाने आघाडी घेण्यास सुरुवात केली

डेव्हिड वॉर्नरचेही (David Warner) अर्धशतक पूर्ण; ऑस्टेलियाच्या 33 षटकात 1 बाद 118 धावा

वॉर्नर - लॅम्बुशग्नेची नाबाद शतकी भागीदारी

मार्नस लॅबुशग्नेचे दमदार अर्धशतक, डेव्हिड वॉर्नरने (David Warner) धावांचा वेग वाढवला

डेव्हिड वॉर्नरची सावध फलंदाजी

रॉबिन्सनने दिला कांगारुंना पहिला धक्का, हरिस 3 धावा करुन परतला

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस देणार सलामी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT