Ashes Series Ben Stokes MS Dhoni  esakal
क्रीडा

Ben Stokes MS Dhoni : सीएसकेच्या 'भावी' कर्णधाराचा धोनीलाच धोबीपछाड; तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत असं काय घडलं?

अनिरुद्ध संकपाळ

Ashes Series Ben Stokes MS Dhoni : तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्स राखून पराभव केला. या विजयाबरोबरच 2 - 0 असा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडने मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले. आता मालिका 2 - 1 अशी आली आहे. लीड्सवरील तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 251 धावांचे आव्हान ठेवले. (Ben Stokes Record)

इंग्लंडने हे आव्हान तीन विकेट्स राखून पार करत मालिकेतील पहिला विजय मिळवला. इंग्लंडच्या विजयात कर्णधार बेन स्टोक्सने देखील मोलाचे योगदान दिले आहे. त्याने पहिल्या डावात 80 धावांची आणि दुसऱ्या डावात 13 धावांची खेळी केली. स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडने चौथ्या डावात 251 धावा चेस केल्यानंतर कर्णधार म्हणून स्टोक्सने महेंद्रसिंह धोनीचे एक मोठे रेकॉर्ड मोडले. (MS Dhoni Test Record)

इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने दुसऱ्या डावात केलेल्या 77 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 251 धावांचे आव्हान 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. इंग्लंडने 251 धावांचे आव्हान पार केल्यानंतर बेन स्टोक्सने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे मोठे रेकॉर्ड मोडले. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने तब्बल पाचव्यांदा 251 धावांचा पाठलाग करत कसोटी जिंकली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावा चेस करण्याचा विक्रम हा यापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या नावावर होता. धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 4 वेळा चौथ्या डावात 250 धावांपेक्षा जास्त धावा चेस केल्या होत्या. (Ashes Series 2023 Records)

250 पेक्षा जास्त धावा चेस करून सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार :

बेन स्टोक्स - 5

एमएमस धोनी - 5

ब्रायन लारा, रिकी पाँटिंग - 3

अ‍ॅशेस मालिकेत 2 - 0 अशा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून आपले आव्हान कायम ठेवले. स्टोक्स या विजयामुळे आनंदी झाला असून तो म्हणाला की, 'अजून एक अटी-तटीचा सामना. सामना जिंकून आम्ही आव्हान जिवंत ठेवल्याने आनंद झाला आहे.'

'नाणेफेक जिंकली आम्ही पहिल्यांदा फलंदाजीही करू शकलो असतो मात्र आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी चांगली होती. मिचेल मार्शने चांगली फलंदाजी करत सामना जिवंत ठेवला. आऊटफिल्ड फास्ट होती. आमच्याकडे वूड आणि वोक्स होते.'

'आम्ही निवडलेल्या संघाने सामन्यावर छाप पाडली. आम्हाला हे खेळाडू सामन्यावर कसा प्रभाव पाडू शकतात हे पहायचं होतं. मला वोक्सने खूप दिवसांपासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही याची जाणीव नव्हती. मात्र त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली. आठव्या क्रमांकावर त्याच्यासारखी फलंदाजी करणार कोणी असणे यामुळे आम्हाला मदत झाली. ज्यावेळी तो पुढचा सामना खेळले त्यावेळी देखील तो अशीच कामगिरी करेल अशी आशा आहे.'

(Cricket Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT