Jonny Bairstow Oil Protestors esakal
क्रीडा

Jonny Bairstow Video : बेअरस्टोने आंदोलकाला कडेवर घेतलं अन्... लॉर्ड्सवर सामना सुरू होताच मोठा ड्रामा

अनिरुद्ध संकपाळ

Jonny Bairstow Oil Protestors : इंग्लंडमध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना आज सुरू झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामन्याची अवघी 10 षटकेही पूर्ण झाले नव्हते तोच दोन आंदोलक मैदानात घुसले. त्यांनी खेळपट्टीवर नारंगी पावडर पेंट फेकण्याचा प्रयत्न केला. समालोचकांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलक जस्ट स्टॉप ऑईल चळवळीतील होते.

दरम्यान, सुरक्षा रक्षक या दोन आंदोलकांना पकडण्यासाठी मैदानात धावले. त्यांची मदत इंग्लंडचा खेळाडू जॉनी बेअरस्टोने केली. त्याने एका आंदोलकाला आपल्या कडेवर घेत मैदानाबाहेर घेऊन गेला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अॅशेस मालिकेत पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिका 1 - 1 बरोबरीत आणण्याच्या दृष्टीने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा देखील मैदानावर आले होते. सामन्याची अवघी काही षटके झाली असताना जस्ट स्टॉप ऑईल चळवळीचे दोन आंदोलक मैदानावर घुसले.

एका आंदोलकाने तर नारंगी रंगाचा पावडर पेंट खेळपट्टीवर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर जॉनी बेअरस्टोने दुसऱ्या आंदोलकाला खेळपट्टीवर जाण्यापासून रोखले अन् त्याला उचलून थेट सीमारेषेच्या बाहेर नेऊन ठेवले. बेअरस्टोच्या या कृतीची स्तुती इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ढगाळ वातावरणात सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या 10 षटकात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाची एकही विकेट घेता आली नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने स्कोअरबोर्ड हलता ठेवला तर उस्मान ख्वाजा त्याला सावध साथ दिली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT