Pat Cummins stop champagne Celebration for Usman Khwaja  esakal
क्रीडा

Video: कमिन्सने ख्वाजासाठी ऑस्ट्रेलियाचे सेलिब्रेशन रोखले

अनिरुद्ध संकपाळ

हॉबर्ट : अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ४ - ० असा दणदणीत विजय मिळवून अ‍ॅशेस (Ashes Series) पुन्हा आपल्याकडे राखल्या. ऑस्ट्रेलियाने (Australia Cricket Team) हॉबर्टवरील दिवस रात्र कसोटी तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा १४६ धावांनी पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मालिका विजयाचे सेलिब्रेशन (Australia Ashes Celebration) करण्यासाठी व्यासपीठावर गेला. मात्र या व्यासपीठावर उस्मान ख्वाजा (Usman Khwaja) नव्हता. हे पाहून कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) आपल्या संघाचे सेलिब्रेशन रोखले आणि उस्मान ख्वाजाला व्यासपीठावर बोलवून घेतले. पॅट कमिन्सच्या या कृतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या बाबतचा व्हिडिओ सध्या व्हयरल होत आहे.

ज्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाला अ‍ॅशेसची ट्रॉफी देण्यात आली त्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू शँपेनची बॉटल उघडून सेलिब्रेशन करण्याच्या बेतात होते. या दरम्यान, चौथ्या कसोटीत संघात समाविष्ट करण्यात आलेला उस्मान ख्वाजा व्यासपीठाच्या खाली संघापासून दूर उभा होता. पॅट कमिन्सला हे समजल्यानंतर त्याने त्वरित शँपेन सेलिब्रेशन (champagne Celebration) रोखले आणि उस्मान ख्वाजाला वर बोलवून घेत संघाच्या जल्लोषात सामिल करुन घेतले. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पॅट कमिन्सच्या या कृतीचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे.

उस्मान ख्वाजाला पाचव्या कसोटीत जरी मोठी खेळी करण्यात यश आले नसले तरी त्याने चौथ्या कसोटीत दोन्ही डावात शतक ठोकले होते. जवळपास अडीच वर्षांनी उस्मान ख्वाजाला संघात स्थान मिळाले होते. ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण झाल्याने तो चौथ्या कसोटीला मुकला होता. त्याच्या जागी उस्मान ख्वाजाला संघात घेण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipake Case : "अभिजीत दिपकेला तात्काळ अटक करा..." सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची दिल्ली पोलिसांत तक्रार; नेमकं काय घडलं?

Ujani Dam: उजनी धरण ९८ टक्के भरले; पंढरपूर, माळशिरस आणि मंगळवेढ्यात वाढली पुराची धास्ती

Supreme Court Judge: 'लाईक्स'साठी बाजारात न्यायाचा लिलाव! सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सोशल मीडियावर का संतापले?

Marathi Live Updates News: खडकवासला धरणासमोरील पुलावरून व्यक्तीची उडी, शोधमोहीम सुरू

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरातील चोरीवरून राजकीय युद्ध पेटले! संशयित आरोपी ठाकरे गटाचा, सदा सरवणकरांचा आरोप

SCROLL FOR NEXT