क्रीडा

Ashes Trophy : ऑस्ट्रेलियन संघाकडून धावांचा पाठलाग सुरु; अखेरच्या दिवशी २४९ धावांची गरज

ॲशेस हा प्रतिष्ठेचा करंडक आपल्याकडे ठेवल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने येथे सुरू असलेल्या अखेरच्या कसोटीत चौथ्या डावात दमदार सुरुवात केली.

सकाळ वृत्तसेवा

ओव्हल - ॲशेस हा प्रतिष्ठेचा करंडक आपल्याकडे ठेवल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने येथे सुरू असलेल्या अखेरच्या कसोटीत चौथ्या डावात दमदार सुरुवात केली आहे. इंग्लंडकडून ३८४ धावांचे आव्हान ठेवण्यात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी पावसाचा व्यत्यय येईपर्यंत बिनबाद १३५ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर खेळ होऊ शकला नाही.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आणखी २४९ धावांची गरज असून या कसोटीचा अखेरचा अर्थातच पाचवा दिवस बाकी आहे. ऑस्ट्रेलियन संघाकडे या मालिकेत २-१ अशी आघाडी आहे.

इंग्लंडने ९ बाद ३८९ या धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली; पण त्यांना फक्त सहा धावांचीच भर घालता आली. टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर जेम्स अँडरसन आठ धावांवर बाद झाला. इंग्लंडला दुसऱ्या डावात ३९५ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३८४ धावांचे आव्हान उभे ठाकले.

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने १०० धावा देत चार फलंदाज बाद केले. टॉड मर्फी याने ११० धावा देत चार फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक -

इंग्लंड - पहिला डाव २८३ धावा आणि दुसरा डाव ३९५ धावा, वि.

ऑस्ट्रेलिया - पहिला डाव २९५ धावा आणि बिनबाद १३५ धावा.

शानदार सलामी

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघातील सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचे आव्हान लीलया परतवून लावले. वॉर्नरने ९ चौकारांसह नाबाद ५८ धावांची आणि ख्वाजाने ८ चौकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाने बिनबाद १३५ धावा केल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला.

ब्रॉडचा अलविदा

इंग्लंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने या कसोटीनंतर क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन हे इंग्लंडचे तळाचे फलंदाज रविवारी खेळपट्टीवर आले, तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ब्रॉडला मानवंदना दिली. ब्रॉड याने इंग्लंडसाठी १६७ कसोटी सामने खेळताना ६०२ फलंदाज बाद केले आहेत. शिवाय त्याने १२१ एकदिवसीय व ५६ टी-२० सामन्यांमध्येही इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : 1935 पासून हरिनामाच्या गजरात निघते सार्वजनिक गणपतीची बैलगाडीतून मिरवणूक

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT